Posts

Showing posts from June, 2024

गोदाउनमधून गॅस सिलेंडर बाटल्याची चोरी : एकाला अटक ; १०० गॅस सिलिंडर केले जप्त

Image
गोदाउनमधून गॅस सिलेंडर बाटल्याची चोरी : एकाला अटक ; १०० गॅस सिलिंडर केले जप्त बोईसर : गॅस सिलेंडर बाटल्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा  २४ तासाच्या आत गुन्हा उघड करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. दांडी पाडा येथील तिघांनी गॅस सिलिंडर चोरीकांड घडवले होते. कोणतंही लिड हातात नसताना पोलिसांनी चोरांना पकडुन आरोपीकडून १०० गॅस सिलिंडर जप्त केले आहे. बोईसर शहरातील चंद्रानी फार्म हाऊस, डि.सी कंपनी समोर बोईसर येथील गॅस एजन्सीचे गोडाऊन आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास एजन्सीच्या गोडाऊनचे कुलुप तोडुन गोडावुनमध्ये प्रवेश करुन १ लाख ३५,००० हजारांचे प्रत्येकी ०५ किलोग्रॅम वजनाचे एफ.टी.एल कंपनीचे गॅसचे १०० बाटले चोरट्याने चोरी करुन चोरून नेले होते. या गुन्ह्याची तक्रार मनोज लक्ष्मीकांत बाजपेई यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.  बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विठ्ठल मणिकेरी व बोईसर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्यात कोणतेही धागेदोर अथवा सि.सी.टि.व्ही फुटेज नसताना गोपनीय माहितीच्या आधारे दांडीपाडा येथे किराणा दुकान च...

बोईसर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत ; पाच शाळकरी मुलांसह 22 नागरिकां वर केला जीवघेणा हल्ला

Image
बोईसर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत ; पाच शाळकरी मुलांसह 22 नागरिकां वर केला जीवघेणा हल्ला बोईसर : बोईसर परिसरात भटक्या कुत्र्यानी अक्षरशः हैदोस घातला आहे. गुरुवारी बोईसरमध्ये एकाच दिवसात २७ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानी चावा घेतला असून या सर्वांना बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे या हल्यांमुळे नागरिकां मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बोईसर शहरासह सरावली, नवापूर नाका, यशवंत सृष्टी, सरावली, खैरापाडा एमआयडीसी परिसर सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली सापडली आहेत. या भागांत भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या खुले आमपणे फिरत आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांकडून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लक्ष केलं जात आहे. शहरातील रस्ते चौक या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांचा हैदोस रोजरासपणे पाहायला मिळतोय. दिवसा आणि रात्री ही भटकी कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. आणि यातूनच नागरिकांवर हल्ले करून त्यांचे लचके तोडली जात आहेत. काल सायंकाळी शाळेतून घरी येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर भटक...

टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Image
टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा २०० जणांनी घेतला लाभ   बोईसर : टाटा स्टील लिमिटेड ग्लोबल वायर्स इंडिया - तारापूर च्या सी.एस.आर. अंतर्गत टी एम आर सी टी थुंगा रुग्णालयाच्या च्या सहकार्याने ग्रामपंचायत पाम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सतीश वालेकर, चिप ऑपरेशन टाटा स्टील,  शिरीष बीडीकर, प्लांट हेड WRM -W, कुणाल बारी, सी एस आर समन्वयक तसेच इतर पाहुण्याचे व तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या सर्व कर्मचारी यांचे पाम ग्रामपंचायत सरपंच दर्शना पिंपळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत असल्यामुळे आयुष्य जगण्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. नागरिकांनी सतत आनंदी राहणे हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे याच उद्देश्याने शुक्रवारी दि.२८ जून रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय, पाम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत आरोग्...

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पालघर पोलीस दलाकडून जनजागृती

Image
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पालघर पोलीस दलाकडून जनजागृती  पालघर : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी २६ जुन रोजी साजरा केला जातो. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी २६ जून २०२४ रोजी पालघर जिल्ह्यात जागतिक अमंली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन प्रत्येक पोलीस ठाणे हद्दित विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले. पालघर पोलीस दलातर्फे जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत विविध शाळा, महाविद्यालये, व्यसन मुक्ती केंद्रे व इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. यावेळी डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय पालघर यांचे अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामाबाबत जिल्ह्यात जास्तीत जास्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानातून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगुन नशामुक्त जीवन जगण्याबाबत आव्हान करून विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवन जगण्याबाबत प्र...

१०८ आदिवासी महिलांच्या नावे १ करोड २५ लाखाचं कर्ज काढून आरोपी महिला फरार; आदिवासी महिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Image
१०८ आदिवासी महिलांच्या नावे १ करोड २५ लाखाचं कर्ज काढून आरोपी महिला फरार; आदिवासी महिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार   पालघर : पालघर तालुक्यातील मनोर, पाटील पाडा येथील १०८ आदिवासी महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या आदिवासी महिलांच्या नावे १ करोड २५ लाखाचं कर्ज काढून आरोपी महिला सुमय्या यासर पटेल फरार झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. वाडा, पालघर, मनोर आदी ठिकाणच्या खासगी बँका तसेच पतसंस्थांकडून महिलांच्या नावावर कर्ज काढले जात होते. त्यासाठी या आदिवासी अशिक्षित महिलांची कागदपत्रे, फोटो वेगवेगळ्या बँकात सादर केले जात होते. कर्ज प्रकरणावर या महिलांच्या सह्या, अंगठे आहेत. सुमय्या ही या आदिवासी महिलांना तुमच्याकडे घरी काही काम नाही, तर महिलांचे गट बनवा, असे सांगायची. त्यासाठी ती प्रत्येक महिलेला एक हजार रुपये द्यायची आणि ज्या महिलेच्या नावावर कर्ज काढले आहे, त्या महिलेला तीन-चार हजार रुपये द्यायची. त्यातून आदिवासी महिलांना हे एक उत्पन्नाचे वेगळे साधन मिळाले असे वाटले. सुमय्या ही या महिलांना विश्वासात घेऊन आपला गाड्या विकण्याचा व्यवसाय आहे. त्यातून मिळालेल्या पैश...

सचिन जगताप यांना महाराष्ट्र मंत्रालया कडून देण्यात आले स्वीकृत पत्रकार कार्ड

Image
सचिन जगताप यांना महाराष्ट्र मंत्रालया कडून देण्यात आले  स्वीकृत पत्रकार कार्ड पालघर : पालघर जिल्ह्यात गेली 20 वर्षे स्वच्छ, निर्भय आणि वेगवान पत्रकारिता करणाऱ्या सचिन नामदेव जगताप यांना दैनिक सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र मंत्रालयाकडून स्वीकृत पत्रकार कार्ड देण्यात आले आहे. सचिन यांना विविध संस्थांनी अनेकवेळा सन्मानित केले आहे. सचिन जगताप यांचीही पालघर जिल्हा पत्रकार संघात उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सचिन यांच्या लेखणीतून त्यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अनेकवेळा सचिन नेहमीच सरकार आणि जनता यांच्यातील माध्यम बनून पत्रकारिता करत आले आहेत. सचिन यांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे आणि इतर अनेक आघाड्यांवर पत्रकारितेतून जनतेला आणि सरकारला संदेश देण्याचे काम केले आहे. सचिन जगताप यांचे जगत भा चे संपादक आशाद शेख सोबत सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.

वाढवण बंदराविरोधात स्थानिकांचा जलसमाधी आणि रेल रोकोचा इशारा

Image
वाढवण बंदराविरोधात स्थानिकांचा जलसमाधी आणि रेल रोकोचा इशारा वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समिती आक्रमक पालघर : वाढवण बंदराला पालघरमधून विरोध तीव्र होत आहे. वाढवण बंदर अरबी समुद्रात बुडवणारच,असा निर्धार पालघर वासियांनी केला आहे. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. पालघर शुक्रवारी रेल रोको, रस्ता रोको, जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिकांनी केंद्रसरकार चा पुतळा जाळून आपला निषेध व्यक्त केला आहे. तसेच भूमीपुत्रांच्या विरोधात असणारे हे बंदर अरबी समुद्रात बुडवण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.आणि कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होऊ देणार नाही, असा निर्धार वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समितीने दिला आहे. वाढवण गावातील भवानी माता मंदिरात झालेल्या सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकत्यांनी ही शपथ घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १९ जून रोजी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी मंजुरी दिली. त्यामुळे वाढवण बंदरविरोधात स्थानिक अधिक आक्रमक झाले आहेत.  वाढवण बंदराला पूर्वीपासून स्थानिकांचा विरोध आहे. तरीही केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने वाढवण बंदर उभा...

रुग्णालयात मर्यादेपेक्षा जास्त औषधांचा साठा ठेवल्यास डॉक्टरवर होणार कारवाई

Image
रुग्णालयात मर्यादेपेक्षा जास्त औषधांचा साठा ठेवल्यास डॉक्टरवर होणार कारवाई बोईसर : बोईसर केमिस्ट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरास अन्न व औषध प्रशासन पालघर उपायुक्त महेश गाडेकर, अन्न व औषध निरीक्षक योगेंद्र पोळ उपस्थित होते. यात त्यांनी सांगितले की, मर्यादेपेक्षा जास्त औषधांचा साठा दवाखान्यात करून तो रुग्णाला विकत असणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल. बोईसर आणि परिसरातील खासगी दवाखाने व रुग्णालयात तेथील प्रॅक्टिस करणारे डॉक्टर मोठ्या प्रमाणावर औषध खरेदी करून त्यांच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना ती विकत असल्याचे आढळून आले आहे. अशा डॉक्टरांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे पालघर येथील उपायुक्त महेश गाडेकर यांनी दिले. महेश गाडेकर पुढे म्हणाले की, 'औषध विक्रेता हा समाजाच्या आरोग्य रक्षणातील महत्त्वाचा घटक असून कायद्याचे काटेकोर पालन करून व्यवसाय करणाऱ्या औषधविक्रेत्यांना अनेक कारणांमुळे व्यावसायिक संघर्ष करावा लागतो. त्यातील प्रमुख म्हणजे अनेक डॉक्टर रुग्णाला मेडिकल स्टोअरमधून औषध घेण्यासाठी सांगण्या...

शिक्षक, पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा

Image
शिक्षक, पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा   पालघर : कोकण विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी दि. २६ जून, २०२४ रोजी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती उपआयुक्त कोकण विभाग तथा सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी १ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व...

पालघर जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या 59 जागासाठी 3577 अर्ज

Image
पालघर जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या 59 जागासाठी 3577 अर्ज  पालघर : पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 /23 अंतर्गत 52 पोलीस शिपाई पदे व 7 बँड्समन  पदासाठी भरती प्रक्रिया 19 जून ते 27 जून दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल मैदान येथे पार पडणार आहे. मैदानी चाचणी व लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यातही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पालघर जिल्ह्यात 52 पोलीस शिपाई आणि सात बँड्समन पदासाठी पुरुषांचे 2822 व महिलांचे 755 असे एकूण 3577 अर्ज आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुल मैदान येथे कागदपत्र तपासणी, शारीरिक तपासणी व गोळा फेक या बाबी पार पडणार आहेत पुरुषांसाठी शंभर मीटर व 1600 मीटर तर महिलांसाठी 100 मीटर व 800 मीटरची परीक्षा पोलीस अधीक्षक कार्यालया जवळील मोरेकुरण  दापोली मार्गावर पावसाची शक्यता गृहीत धरून या ठिकाणी नियोजन करण्यात आले असल्याचे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी सांगितले.  पोलीस भरती प्रक्रियेत येणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही आमिषाला बळी पडू नये त्याचप्रमाणे कोणी पैशाची मागणी करत असल्यास किंवा आर्थिक व्यवहाराशी संशय आल्यास तात्काळ 02525- 205300 तसेच पोलीस उपअधी...

लोखंडी पान्याने डोक्यात वार ; भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची केली निघृणपणे हत्या

Image
लोखंडी पान्याने डोक्यात वार ; भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची केली निघृणपणे हत्या वसई : भररस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. आरती यादव (वय २०) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून, रोहित यादव (२९) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि न. ३२० / २०२४ भा. द वी कलम ३०२ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार अटक आरोपी रोहित यादव रा. हरयाणा व मयत मुलगी आरती यादव रा.उत्तर प्रदेश यांचे ०६ वर्षांपासूनचे प्रेम संबंध होते. आरोपी रोहित याने एक महिन्यांपूर्वी मयत मुलीस एका खाजगी कंपनीत कामाला लावले होते. तो तिला रोज कामावर सोडायचा. परंतु काही दिवासापूर्वी मयत मुलगी आरती यादव हिचे तिच्या कंपनीत एका मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याचे आरोपीला समजले व मयत मुलगीही आरोपी बरोबर बोलण्यास व फोन करण्यास टाळाटाळ करत होती याचा मनात राग येऊन या कारणावरून दी १८ जुन रोजी आरोपीने इंडस्ट्रिय...

स्नेहा चौधरी हिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षेसाठी कॅन्डल मार्च

Image
स्नेहा चौधरी हिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षेसाठी कॅन्डल मार्च पालघर : पालघर तालुक्यातील मुरबे येथील प्रेम प्रकरणातून नवनीत तांडेल (21) याने स्नेहा चौधरी  (17) तिची निर्घृण हत्या केली होती. या विरोधात गावात संताप व्यक्त करण्यात येत होता. हा आरोपी सुटू नये यासाठी व त्यास कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी गावातील महिलांनी कॅण्डल मार्च काढत राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात हे प्रकरण फास्टट्रॅक वर घेण्याची मागणी केली. मुरबे येथील श्रीराम मंदिराजवळ राहणाऱ्या स्नेहा हीचे आरोपी सोबत अनेक वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते.  मात्र ह्याला मुलीच्या कुटुंबियांकडून विरोध होता.सोमवारी १० जून रोजी आरोपीने स्नेहा हिला आपल्या मोटारसायकल वर सोबत घेऊन कुंभवली  गाठले.तेथे दोघेही उतरल्या नंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक घडल्यावर आरोपीने स्नेहाच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केले.ही घटना पाहिल्यावर स्थानिकांनी त्याला जाब विचारीत तेथून निघून जाण्यास सांगितले.त्यानंतर दोघेही पुन्हा मोटारसायकल वर बसून एकलारे च्या दिशेने निघून गेले.आरोपीने झाडाझुडपातील निर्जन स्थळ शोधून काढीत पुन्...

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

Image
तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका  तारापुर : दि.१४ जून रोजी विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, बोईसर यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, तारापुर पोलीस ठाणे हद्दीत कुरगांव रॉयल गार्डन, रुम क्रमांक १०२, ए विंग या सदनिकामध्ये एक महिला अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहीती मिळाली. सदर माहीती प्राप्त होताच बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, बोईसर व तारापुर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या सह सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणाहुन १ पिडीत महिलेची सुटका करण्यात आलेली असुन १ महिला आरोपी हिच्या विरुध्द तारापुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.४०/२०२४ भादवि कलम ३७० सह अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी  बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी,...

सरावली ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय भूखंड भूमाफिया करिता राखीव...

Image
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय भूखंड भूमाफिया करिता राखीव... बोईसर: सरकारी कामात अडथळा आणला तर गुन्हा दाखल होतो परंतु शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून  इमारतीचे बांधकाम केल्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही याचाच अर्थ महसूल अधिकारी व या भूमाफियांमधील सुरू असलेले साटेलोटे तर नाही ना... या भूमाफियांचे मनोबल वाढविण्याचे काम स्थानिक तलाठी तसेच मंडळ अधिकारी देखील करत आहे त्यांना पाठीशी घालण्याचे काम हे अधिकारी करत आहेत. सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवध नगर येथे शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू आहेत डोळ्यादेखत या अनधिकृत इमारतीचे बांधकाम राजरोसपणे सुरू असताना हाकेच्या अंतरावर असलेले महसूल अधिकारी मूग गिळून गप्प का बसले आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी हा शासकीय भूखंड या भूमाफियाकरता राखीव ठेवला आहे का ? अवधनगर येथिल अलशिफा गल्ली येथे कादिर खान, सोनू खान, मोसिम शेख यांनी शासकीय भूखंडावर  अतिक्रमण करुन अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू केलेले असताना  स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी  दुर्लक्ष का करत आहेत वेळीच हे अनधिकृत बांधकामे थांबवता येत नाही का ? का...

वारांगडे येथे जागतिक पर्यावरण दिवशीच जिवंत झाडांची कत्तल

Image
वारांगडे येथे जागतिक पर्यावरण दिवशीच जिवंत झाडांची कत्तल बोईसर: ५ जुन जागतिक पर्यावरण दिवशीच मान ग्रामपंचायत हद्दीतील वारांगडे येथे गुरचरण जागेवरील जिवंत झाडांची कत्तल कऱण्यात आली आहे . वारांगडे येथे आदिवासी लोकांची जागा परप्रांतीयांनी विकत घेऊन अनधिकृत बांधकाम करुन व्यवसाय करण्यासाठी त्या जागेत असण्याऱ्या झाडांची वन विभाग कडून कोणतीही परवानगी न घेता झाडे तोडण्यात आली आहेत.  झाड लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ जून महिना असतो. जून हा लागवडीचा सर्वोत्तम हंगाम त्याचबरोबर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्यात  रोपांना भरपूर पाणी मिळते  त्यामुळे  झाडांची खरी वाढ आणि जीवन पावसानंतर येते. म्हणून, झाडे लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे जून असतो  त्यामूळेच या कालावधीत झाडे तोडण्याची परवानगी दिली जात नसताना वारांगडे येथे झाडे तोडण्यात आली आहे .वृक्षतोड करून पर्यावरणाला हानी पोहचविले म्हणून जागा मालकावर व झाडाची कत्तल करण्यावर कठोर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची मांगणी पर्यावरण प्रेमींनी करुन असंतोष व्यक्त केला आहे .

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

Image
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण बोईसर : बोईसर शहरातील पश्चिमेस ओस्तवाल वंडरसिटी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तिला बेदम मारहाण करुन  डोक्यात लोखंडी रॉडने मारुन दुखापत केल्याची घटना 9 जून रोजी सायकांळी 7 वाजून 20 मि च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात 10 जून रोजी 2 वाजता सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास पप्पू साही वय ( 27 वर्ष) रा- रूपरजत पार्क, हा तरुण आपल्या परिवारासह राहत असुन नोकरी करुन आपला उदरनिर्वाह करतो. 9 जून रोजी सायकांळी 7 वाजून 20 मि रूपरजत पार्क येथुन ओस्तवाल वंडर सिटी जात असताना  शिवम झायाचे आर्दश सिंग यांचेत वाद चालू होते. तेथे त्यांची समजूत काढत असताना त्यागोष्टीचा मनात राग धरून अभिषेक ऊर्फ गोलू सिंग यांचे हातात असलेला लोखंडी रॉडने  डोकीत उपट मारुन दुखापत केली तसेच शिवम (करुणेश) सिंग, सोएब खान व इतर 4 जण यांनी जमिनीवर खाली पाडून  पोटावर, छातीवर, गुप्तभागावर पाठीवर लाथांनी व ठोश्याबुक्कयांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, ही घटना घडल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसा...

मोटार सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याना अटक करून ; १७ मोटार सायकल केले जप्त.

Image
मोटार सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याना अटक करून ; १७ मोटार सायकल केले जप्त पालघर: तलासरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील महिन्यापासून मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने चालु असल्याने मोटर सायकल चोरीचे ठाण्यात १२ गुन्हे दाखल झाले होते. तलासरी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्राचे लगत असलेले गुजरात राज्य व दादरा नगर हवेली, केंद्र शासीत प्रदेश राज्याची हद्द आहे. मोटार सायकल चोरीबाबत सातत्याने गुन्हे घडत असल्याने तलासरी पोलीस ठाण्यातील अधिनस्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांना रात्रौगस्त सक्त करणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु मोटार सायकल चोरीचे गुन्हयाचे प्रमाणात वाढ चालुच होती. त्यामुळे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये अंकीता कणसे, उविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करणेकामी योग्य त्या सुचना देवुन पोलीस ठाण्याचे एक पथक नेमणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे तलासरी पोलीस ठाण्याचे नेमणुकीतील सफौ/हिरामण खोटरे, सफौ/उमतोल, पोहवा/विश्वास धारणे, पोना/महेश बोरसा, पोशि/संदीप चौधरी, यांचे पथक नेमून करून त्यांना पोलीस ठाण्याचे हद...

महायुतीचे नेते ओळखपत्राविना थेट मतमोजणी केंद्रात

Image
महायुतीचे नेते ओळखपत्राविना थेट मतमोजणी केंद्रात पालघर : ४ जूनला पालघर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री रविंद्र चव्हाण महायुतीच्या काही नेत्यांना सोबत घेऊन, कोणतेही ओळखपत्र नसतानाही मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर गेले असताना त्यांना रोखण्याऐवजी पोलिसांनी सलामी दिली. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पालघर येथील मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी निवडणूक आयोगाने विशिष्ट ओळखपत्रे दिली होती. मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाची तसेच ओळखपत्रांची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. मतमोजणी केंद्राकडे येणाऱ्या मार्गावर ठेवण्यात आला होता. असे असतानाही भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी आघाडी घेतल्यानंतर साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री रविंद्र चव्हाण महायुतीच्या नेत्यांसोबत मतमोजणी केंद्रात दाखल झाले होते. मात्र, प्रत्येकाची कडक तपासणी करणाऱ्या पोलीस अधिकारी किंवा निवडणुक कर्मचाऱ्यां...

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या वार्डातच अस्वच्छता व साथीच्या आजारांचा विळखा.....

Image
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या वार्डातच अस्वच्छता व साथीच्या आजारांचा विळखा..... राऊळ मोती नगर रहिवाश्यांच्या मलमूत्राने धारण केले तलावाचे स्वरूप तारापूर :  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या वार्डात बोईसर तारापूर मुख्य रस्त्यालगत मलमूत्राने तलावाचे स्वरूप धारण केलेल्या प्रकारामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्हा परिषद गट तारापूरातून निवडणुक लढविली होती त्यांच्या आश्वासनाच्या भूलथापांना बळी पडत मतदारांनी देखील निकम यांना भरघोस मतांनी निवडून दिले परंतु त्यांच्या या गटात कुरगाव ग्रामपंचायत हद्दीत सर्वे क्रमांक १७८/१/१, १७८/१/२, १९/३/१ ते ४ व १७८/३ या भूखंडावर राऊळ मोती नगर इमारतीचे बांधकाम सुविधा डेव्हलपर या कंपनीकडून करण्यात आलेले असून ४८००० चौ मीटरच्या या बांधकामाला केंद्रीय तसेच राज्य पर्यावरण विभागाकडून परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर राष्ट्रीय हरित लवादाकडून २००६ साली निर्गमित केलेल्या मार्गदर्शक परिपत्रकाचे पालन न करता या सुविधा डेव्हलपर कंपनीकडून एच टी पी प्लांट उभारण्यात आलेले नसून असेल तर ते कार्यान्वित का करण...

पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु : अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश

Image
पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु : अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश  पालघर : पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून ) हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 1951 चे कलम ३७(१) (३) अन्वये पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस हद्दीत दिनांक ६/०६/२०२४ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक १९/०६/२०२४  रोजी २४ .00 वा. या कालावधीपर्यत मनाई आदेश लागू केले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी पालघर सुभाष भागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोणताही दाहक पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे , दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करणे , गा...

४ जून ला ठरणार महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी....

Image
४ जून ला ठरणार महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी... महाराष्ट्र : लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपला आहे, त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता ४ जूनकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत एकीकडे देशात नेमका काय निकाल लागेल याची उत्सुकता असताना महाराष्ट्रातील ४८ लोकसभा  जागेसाठी झालेल्या निवडणूकिचा निकाल उत्कंठा वाढवणारा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक राजकारण करण्यात आलं असून या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता आहे. महाराष्ट्रात महायूती आणि महाविकास आघाडी असा सामना होता. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात नेमकं काय होणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकी सत्ता कोणाची येणार हे सांगण सगळ्यात कठीण राज्य आहे . महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे...

पालघर पोलीसाचा वेग वाढणार ; १७ वाहनांची पडली भर

Image
पालघर पोलीसाचा वेग वाढणार ; १७ वाहनांची पडली भर  पालघर : पालघर पोलीस दलास दैनंदिन कामकाजाकरीता व कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याकरीता मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेकडून व जिल्हा नियोजन व विकास समितीकडून एकूण १७ वाहने मिळालेली आहेत. त्यापैकी १ महिंद्रा एक्स्युची-७००, ४ महिंद्रा स्कॉर्पिओ, ४ मारुती ईको अशी एकूण ९ वाहने हे जिल्हा नियोजनकडून असून ३ टाटा बस व ५ बजाज पल्सर (दुचाकी) अशी एकूण ८ वाहने विकास समितीच्या प्राप्त निधीतुन मिळालेली आहे हे  मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कडून मिळालेली आहेत. सदर वाहनांचे उ‌द्घाटन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर,  पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे संपन्न झाले.