४ जून ला ठरणार महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी....
४ जून ला ठरणार महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी...
महाराष्ट्र : लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपला आहे, त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता ४ जूनकडे लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत एकीकडे देशात नेमका काय निकाल लागेल याची उत्सुकता असताना महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागेसाठी झालेल्या निवडणूकिचा निकाल उत्कंठा वाढवणारा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक राजकारण करण्यात आलं असून या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता आहे.
महाराष्ट्रात महायूती आणि महाविकास आघाडी असा सामना होता. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात नेमकं काय होणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकी सत्ता कोणाची येणार हे सांगण सगळ्यात कठीण राज्य आहे . महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment