सरावली ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय भूखंड भूमाफिया करिता राखीव...

सरावली ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय भूखंड भूमाफिया करिता राखीव...


बोईसर: सरकारी कामात अडथळा आणला तर गुन्हा दाखल होतो परंतु शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून  इमारतीचे बांधकाम केल्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही याचाच अर्थ महसूल अधिकारी व या भूमाफियांमधील सुरू असलेले साटेलोटे तर नाही ना... या भूमाफियांचे मनोबल वाढविण्याचे काम स्थानिक तलाठी तसेच मंडळ अधिकारी देखील करत आहे त्यांना पाठीशी घालण्याचे काम हे अधिकारी करत आहेत.

सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवध नगर येथे शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू आहेत डोळ्यादेखत या अनधिकृत इमारतीचे बांधकाम राजरोसपणे सुरू असताना हाकेच्या अंतरावर असलेले महसूल अधिकारी मूग गिळून गप्प का बसले आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी हा शासकीय भूखंड या भूमाफियाकरता राखीव ठेवला आहे का ?

अवधनगर येथिल अलशिफा गल्ली येथे कादिर खान, सोनू खान, मोसिम शेख यांनी शासकीय भूखंडावर  अतिक्रमण करुन अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू केलेले असताना  स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी  दुर्लक्ष का करत आहेत वेळीच हे अनधिकृत बांधकामे थांबवता येत नाही का ? काम सुरू असताना बांधकामासाठी लागणारे साहित्य, अवैध पद्धतीने आणलेले गौण खनिज जप्त करता येत नाही का ? तात्कालीन तहसीलदार सुनील शिंदे यांनी जशी सिंघम स्टाईलने केलेली तोडक कारवाई  तहसीलदार रमेश शेंडगे करणार का ?

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी