शिक्षक, पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा

शिक्षक, पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा

 


पालघर : कोकण विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी दि. २६ जून, २०२४ रोजी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती उपआयुक्त कोकण विभाग तथा सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.

या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी १ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. या रजेबाबतचा शासन निर्णय www. ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन यादव यांनी केले आहे.




Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी