टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा २०० जणांनी घेतला लाभ 



बोईसर : टाटा स्टील लिमिटेड ग्लोबल वायर्स इंडिया - तारापूर च्या सी.एस.आर. अंतर्गत टी एम आर सी टी थुंगा रुग्णालयाच्या च्या सहकार्याने ग्रामपंचायत पाम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात सतीश वालेकर, चिप ऑपरेशन टाटा स्टील, 

शिरीष बीडीकर, प्लांट हेड WRM -W, कुणाल बारी, सी एस आर समन्वयक तसेच इतर पाहुण्याचे व तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या सर्व कर्मचारी यांचे पाम ग्रामपंचायत सरपंच दर्शना पिंपळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत असल्यामुळे आयुष्य जगण्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. नागरिकांनी सतत आनंदी राहणे हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे याच उद्देश्याने शुक्रवारी दि.२८ जून रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय, पाम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत आरोग्य शिबिर तपासणीला पाम ग्रामस्थानी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देऊन पाम शाळेतील मुलानीही याचा लाभ घेतला सदर शिबिरात तज्ञ डॉक्टर द्वारे ब्लड प्रेशर ,पल्स, रैंडम ब्लड शुगर , इ सी जी, आय टेस्टिंग संबधी तपासण्या केल्या या शिबिरात रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करण्यासोबतच त्यांना आजारावर मोफत औषधेही देण्यात आली.


या सदर आरोग्य शिबिरात थूंगा हॉस्पिटलचे डॉ. अमित यादव व इन्फिगो आय केयर हॉस्पिटलचे डॉ. नूतन डवरी (आय स्पेशालिस्ट) आदींनी २०० जणाची आरोग्य तपासणी केली. 
तसेच या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाम ग्रामपंचायत सरपंच दर्शना पिंपळे, सदस्य श्वेता संखे, पूजा वडे, अर्चना संखे, भारती पाटील , कल्पेश संखे, मनिष जाधव, मनीष संखे व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी