गोदाउनमधून गॅस सिलेंडर बाटल्याची चोरी : एकाला अटक ; १०० गॅस सिलिंडर केले जप्त

गोदाउनमधून गॅस सिलेंडर बाटल्याची चोरी : एकाला अटक ; १०० गॅस सिलिंडर केले जप्त


बोईसर : गॅस सिलेंडर बाटल्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा २४ तासाच्या आत गुन्हा उघड करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. दांडी पाडा येथील तिघांनी गॅस सिलिंडर चोरीकांड घडवले होते. कोणतंही लिड हातात नसताना पोलिसांनी चोरांना पकडुन आरोपीकडून १०० गॅस सिलिंडर जप्त केले आहे.

बोईसर शहरातील चंद्रानी फार्म हाऊस, डि.सी कंपनी समोर बोईसर येथील गॅस एजन्सीचे गोडाऊन आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास एजन्सीच्या गोडाऊनचे कुलुप तोडुन गोडावुनमध्ये प्रवेश करुन १ लाख ३५,००० हजारांचे प्रत्येकी ०५ किलोग्रॅम वजनाचे एफ.टी.एल कंपनीचे गॅसचे १०० बाटले चोरट्याने चोरी करुन चोरून नेले होते. या गुन्ह्याची तक्रार मनोज लक्ष्मीकांत बाजपेई यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. 


बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विठ्ठल मणिकेरी व बोईसर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्यात कोणतेही धागेदोर अथवा सि.सी.टि.व्ही फुटेज नसताना गोपनीय माहितीच्या आधारे दांडीपाडा येथे किराणा दुकान चालविणारे विजयशंकर रामसबद गुप्ता (वय-३५ वर्षे) यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडुन संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच बज्जु जगताप व त्यांचे अन्य फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरिक्षक विठ्ठल मणिकेरी हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी