स्नेहा चौधरी हिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षेसाठी कॅन्डल मार्च

स्नेहा चौधरी हिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षेसाठी कॅन्डल मार्च


पालघर : पालघर तालुक्यातील मुरबे येथील प्रेम प्रकरणातून नवनीत तांडेल (21) याने स्नेहा चौधरी  (17) तिची निर्घृण हत्या केली होती. या विरोधात गावात संताप व्यक्त करण्यात येत होता. हा आरोपी सुटू नये यासाठी व त्यास कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी गावातील महिलांनी कॅण्डल मार्च काढत राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात हे प्रकरण फास्टट्रॅक वर घेण्याची मागणी केली.

मुरबे येथील श्रीराम मंदिराजवळ राहणाऱ्या स्नेहा हीचे आरोपी सोबत अनेक वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते.  मात्र ह्याला मुलीच्या कुटुंबियांकडून विरोध होता.सोमवारी १० जून रोजी आरोपीने स्नेहा हिला आपल्या मोटारसायकल वर सोबत घेऊन कुंभवली  गाठले.तेथे दोघेही उतरल्या नंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक घडल्यावर आरोपीने स्नेहाच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केले.ही घटना पाहिल्यावर स्थानिकांनी त्याला जाब विचारीत तेथून निघून जाण्यास सांगितले.त्यानंतर दोघेही पुन्हा मोटारसायकल वर बसून एकलारे च्या दिशेने निघून गेले.आरोपीने झाडाझुडपातील निर्जन स्थळ शोधून काढीत पुन्हा त्याने स्नेहाशी भांडण उकरून काढीत तिच्या डोक्यात दगड घालून तिला खाडीच्या पाण्यात बुडवून तिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.        


एका नराधमाने प्रेम प्रकरणातून एका मुलीचा अत्यंत निर्घृण पने केलेल्या खुनामुळे पालक वर्गात आपल्या पाल्याप्रती अत्यंत काळजी चे वातावरण निर्माण झाले आहे. त्याने केलेले हे कृत्य अत्यंत दहशत निर्माण करणारे असून अश्या घटनाची पुनरावृत्ती घडू नये ह्यासाठी रविवारी रात्री मुरबे येथील श्रीराम मंदिर ते हुतात्मा स्मारक दरम्यान कॅन्डल मोर्चा काढण्यात आला ह्या मोर्चामध्ये हजारो स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविलां. महिला आणि तरुण मुलींचा मोठा सहभाग नोंदविला नंतर मुरबे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मुख्यमंत्री,राज्यपाल ह्यांना लिहिलेल्या निवेदनात हे प्रकरण फास्टट्रॅक वर घेत आरोपी विरोधात कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी स्थानिकानी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी