वाढवण बंदराविरोधात स्थानिकांचा जलसमाधी आणि रेल रोकोचा इशारा
वाढवण बंदराविरोधात स्थानिकांचा जलसमाधी आणि रेल रोकोचा इशारा
वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समिती आक्रमक
केंद्रीय मंत्रिमंडळाने १९ जून रोजी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी मंजुरी दिली. त्यामुळे वाढवण बंदरविरोधात स्थानिक अधिक आक्रमक झाले आहेत. वाढवण बंदराला पूर्वीपासून स्थानिकांचा विरोध आहे. तरीही केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने वाढवण बंदर उभारणीला मंजुरी देऊन स्थानिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समितीने केला आहे. यापुढे कोकण किनारपट्टीचा भूमिपुत्र एकत्र एकत्रित येऊन या विनाशकारी प्रकल्पविरोधात लढा देण्याचा निर्धार सभेमध्ये व्यक्त करण्यात आला.
वाढवण बंदर निर्माण करण्यापेक्षा येथील जैवविविधता टिकवण्यासाठी मरिन पार्क तयार करा. आमच्या येथे राग उचलायची आणि रांगोळ्या गुजरातला काढायच्या, असे सरकारचे सुरू आहे. आम्हाला अशाश्वत विकास नको, असा नारा देत वाढवण बंदर होऊ देणार नाही, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. स्वप्नील तरे, भूषण भोईर, हेमंत तामोरे, शशी सोनावणे, भारत वायदा, नरेंद्र पाटील, नरेंद्र सुतारी, राजश्री भानाजी, विजय वझे, प्रताप अकरे, किरण दळवी, हर्षद पाटील, उत्तेन पाटील, शरद दळवी, प्रदीप पाटील याप्रमुख पदाधिकाऱ्यांसह वाढवणसह डहाणूखाडी, चिंचणी, वरोर, दिघरेपाडा आदी गावातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
Comments
Post a Comment