जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या वार्डातच अस्वच्छता व साथीच्या आजारांचा विळखा.....

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या वार्डातच अस्वच्छता व साथीच्या आजारांचा विळखा.....

राऊळ मोती नगर रहिवाश्यांच्या मलमूत्राने धारण केले तलावाचे स्वरूप



तारापूर :  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या वार्डात बोईसर तारापूर मुख्य रस्त्यालगत मलमूत्राने तलावाचे स्वरूप धारण केलेल्या प्रकारामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्हा परिषद गट तारापूरातून निवडणुक लढविली होती त्यांच्या आश्वासनाच्या भूलथापांना बळी पडत मतदारांनी देखील निकम यांना भरघोस मतांनी निवडून दिले परंतु त्यांच्या या गटात कुरगाव ग्रामपंचायत हद्दीत सर्वे क्रमांक १७८/१/१, १७८/१/२, १९/३/१ ते ४ व १७८/३ या भूखंडावर राऊळ मोती नगर इमारतीचे बांधकाम सुविधा डेव्हलपर या कंपनीकडून करण्यात आलेले असून ४८००० चौ मीटरच्या या बांधकामाला केंद्रीय तसेच राज्य पर्यावरण विभागाकडून परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर राष्ट्रीय हरित लवादाकडून २००६ साली निर्गमित केलेल्या मार्गदर्शक परिपत्रकाचे पालन न करता या सुविधा डेव्हलपर कंपनीकडून एच टी पी प्लांट उभारण्यात आलेले नसून असेल तर ते कार्यान्वित का करण्यात आलेला नाही. राऊळ मोती नगर रहिवाश्यांचा मलमूत्र मुख्य रस्त्यालगत तलावाचे स्वरूप धारण केलेले असून पावसाळ्यात या तलावाचे पाणी मुख्य रस्त्यावर उतरून अनेकवेळा अपघात देखील घडलेले आहेत तसेच या साचलेल्या मलमुत्रामुळे नागरिकांना अनेक साथीच्या आजारांना बळी पडावं लागत असताना राज्यमंत्री दर्जा असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम या प्रकरणी दुर्लक्ष का करत आहेत. 



आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या निकम यांना तारापूर गटातील मतदारांची गरज नाही का ? तारापूर गटातून निवडून येताच अध्यक्ष पदी विराजमान झालेले निकम यांनी तारापूरात दुर्लक्ष करत मोखाडा गटाकडे लक्ष केंद्रित केले आहे असा आरोप तारापूर गटातील मतदारांनी केला आहे. तर या बांधकामात जिल्हा परिषदेच्या आजी माजी सदस्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने विकासकाकडून बक्षीस म्हणून मालमत्ता गोळा करून ठेवल्याचे  काही नागरिक बोलत आहेत. दरम्यान सदर बांधकामाला पर्यावरण विभागाकडून परवानगी नसताना जिल्हा प्राधिकरणाकडून पुन्हा एकदा सुधारीत बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आलेली असून जिल्हा प्राधिकरण सुविधा डेव्हलपर या विकासकावर मेहरबान का झाला आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी