सचिन जगताप यांना महाराष्ट्र मंत्रालया कडून देण्यात आले स्वीकृत पत्रकार कार्ड
सचिन जगताप यांना महाराष्ट्र मंत्रालया कडून देण्यात आले स्वीकृत पत्रकार कार्ड
पालघर : पालघर जिल्ह्यात गेली 20 वर्षे स्वच्छ, निर्भय आणि वेगवान पत्रकारिता करणाऱ्या सचिन नामदेव जगताप यांना दैनिक सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र मंत्रालयाकडून स्वीकृत पत्रकार कार्ड देण्यात आले आहे. सचिन यांना विविध संस्थांनी अनेकवेळा सन्मानित केले आहे. सचिन जगताप यांचीही पालघर जिल्हा पत्रकार संघात उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिन यांच्या लेखणीतून त्यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अनेकवेळा सचिन नेहमीच सरकार आणि जनता यांच्यातील माध्यम बनून पत्रकारिता करत आले आहेत. सचिन यांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे आणि इतर अनेक आघाड्यांवर पत्रकारितेतून जनतेला आणि सरकारला संदेश देण्याचे काम केले आहे.
सचिन जगताप यांचे जगत भा चे संपादक आशाद शेख सोबत सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment