पालघर जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या 59 जागासाठी 3577 अर्ज

पालघर जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या 59 जागासाठी 3577 अर्ज 


पालघर : पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 /23 अंतर्गत 52 पोलीस शिपाई पदे व 7 बँड्समन  पदासाठी भरती प्रक्रिया 19 जून ते 27 जून दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल मैदान येथे पार पडणार आहे. मैदानी चाचणी व लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यातही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पालघर जिल्ह्यात 52 पोलीस शिपाई आणि सात बँड्समन पदासाठी पुरुषांचे 2822 व महिलांचे 755 असे एकूण 3577 अर्ज आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुल मैदान येथे कागदपत्र तपासणी, शारीरिक तपासणी व गोळा फेक या बाबी पार पडणार आहेत पुरुषांसाठी शंभर मीटर व 1600 मीटर तर महिलांसाठी 100 मीटर व 800 मीटरची परीक्षा पोलीस अधीक्षक कार्यालया जवळील मोरेकुरण  दापोली मार्गावर पावसाची शक्यता गृहीत धरून या ठिकाणी नियोजन करण्यात आले असल्याचे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी सांगितले. 

पोलीस भरती प्रक्रियेत येणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही आमिषाला बळी पडू नये त्याचप्रमाणे कोणी पैशाची मागणी करत असल्यास किंवा आर्थिक व्यवहाराशी संशय आल्यास तात्काळ 02525- 205300 तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह ) यांच्या 9769832478 या भ्रमणध्वनी वर संपर्क साधण्

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी