जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पालघर पोलीस दलाकडून जनजागृती
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पालघर पोलीस दलाकडून जनजागृती
पालघर : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी २६ जुन रोजी साजरा केला जातो. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी २६ जून २०२४ रोजी पालघर जिल्ह्यात जागतिक अमंली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन प्रत्येक पोलीस ठाणे हद्दित विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले.
पालघर पोलीस दलातर्फे जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत विविध शाळा, महाविद्यालये, व्यसन मुक्ती केंद्रे व इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. यावेळी डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय पालघर यांचे अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामाबाबत जिल्ह्यात जास्तीत जास्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानातून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगुन नशामुक्त जीवन जगण्याबाबत आव्हान करून विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवन जगण्याबाबत प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थी व नागरीक यांची रॅली काढण्यात आली.
जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत औद्योगिक परीसर, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, झोपडपट्टी मोहल्ला या परीसरात बॅनर होर्डीग लावून जनजागृती करण्यात आली. तसेच अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत विविध सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, सहकारी संस्था यांचे मदतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले आहेत.
सदर कार्यक्रम हा बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि/गणपत सुळे, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व पोलीस अंमलदार यांनी राबविला.
Comments
Post a Comment