मोटार सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याना अटक करून ; १७ मोटार सायकल केले जप्त.

मोटार सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याना अटक करून ; १७ मोटार सायकल केले जप्त


पालघर: तलासरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील महिन्यापासून मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने चालु असल्याने मोटर सायकल चोरीचे ठाण्यात १२ गुन्हे दाखल झाले होते. तलासरी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्राचे लगत असलेले गुजरात राज्य व दादरा नगर हवेली, केंद्र शासीत प्रदेश राज्याची हद्द आहे. मोटार सायकल चोरीबाबत सातत्याने गुन्हे घडत असल्याने तलासरी पोलीस ठाण्यातील अधिनस्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांना रात्रौगस्त सक्त करणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु मोटार सायकल चोरीचे गुन्हयाचे प्रमाणात वाढ चालुच होती. त्यामुळे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये अंकीता कणसे, उविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करणेकामी योग्य त्या सुचना देवुन पोलीस ठाण्याचे एक पथक नेमणेबाबत आदेशीत केले.

त्याप्रमाणे तलासरी पोलीस ठाण्याचे नेमणुकीतील सफौ/हिरामण खोटरे, सफौ/उमतोल, पोहवा/विश्वास धारणे, पोना/महेश बोरसा, पोशि/संदीप चौधरी, यांचे पथक नेमून करून त्यांना पोलीस ठाण्याचे हद्दीत दिवसरात्र गस्त करून मोटार सायकल चोरी व मालमत्तेचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या साठी नेमण्यात आले होते. त्याप्रमाणे विजय मुतडक, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे हे पोलीस पथकासह पोलीस ठाण्याचे हद्दीत गुन्हेगारांचे मागावर होते.


वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे सफौ/हिरामण खोटरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दादरा नगर हवेली या पोलीस ठाणे हद्दीलगतच्या केद्रशासित प्रदेशातील गुन्हेगार शशिकांत जयसिंग पटेल, वय ३० वर्षे रा. बोरीगाव जि. बलसाड हा वाहन चोरीमध्ये पटाईत असुन तो अतिशय सावधपणे स्वतःचे अस्तित्व लपवुन गुन्हे करीत असून सदर गुन्हेगार हा अटल गुन्हेगार असल्याने तो नेहमीच सावधपणे फिरत असतो अशी गुप्त माहिती मिळाली. याबाबत सफौ/खोटरे आणि पथकांनी खात्री करुन पाळत ठेवुन सदर आरोपीस बेसावध क्षणी अत्यंत शिताफिने दि. १०/०६/२०२४ रोजी पहाटे ४. वा  दादरा नगर हवेली सीमेवर ताब्यात घेतले. त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन आरोपी १) अमर अशोक थोडी (वय २७ वर्षे) जिल्हा . पालघर २) प्रथमेश परेश नारगोलकर( वय २७ वर्षे ) जि. वलसाड गुजरात यांचे सोबत गुन्हे केल्याचे कबुल केले. नमुद दोन्ही आरोपीस देखील काही तासात मौजे गिरगाव ता. डहाणु येथून  ताब्यात घेतले.


नमुद आरोपीन कडून एकूण १७ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये ०२ टी.व्ही.एस. ज्युपीटर, ०९ होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल, ०५ हिरो स्पेल्डर प्लस अशा मोटार साकलचा समावेश आहे. नमुद आरोपीतांकडून तलासरी पोलीस ठाण्याचे १२ गुन्हे, घोलवड पोलीस ठाणे ०६ गुन्हे, उंबरगांव पोलीस ठाणे ०३ गुन्हे व सेलवास पोलीस ठाणे ०१ असे एकूण २२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उर्वरीत मोटार सायकल अटक आरोपी कडून जप्त करण्यात येत आहेत.


सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, अंकीता कणसे, उविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाणेच्या वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे सफौ / हिरामण खोटरे, सफौ/उमतोल, पोहवा/विश्वास धारणे, पोना/महेश बोरसा, पोशि/संदीप चौधरी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. गुन्हयाचा पुढिल तपास तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी