भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण
बोईसर : बोईसर शहरातील पश्चिमेस ओस्तवाल वंडरसिटी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तिला बेदम मारहाण करुन डोक्यात लोखंडी रॉडने मारुन दुखापत केल्याची घटना 9 जून रोजी सायकांळी 7 वाजून 20 मि च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात 10 जून रोजी 2 वाजता सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास पप्पू साही वय ( 27 वर्ष) रा- रूपरजत पार्क, हा तरुण आपल्या परिवारासह राहत असुन नोकरी करुन आपला उदरनिर्वाह करतो. 9 जून रोजी सायकांळी 7 वाजून 20 मि रूपरजत पार्क येथुन ओस्तवाल वंडर सिटी जात असताना
शिवम झायाचे आर्दश सिंग यांचेत वाद चालू होते. तेथे त्यांची समजूत काढत असताना त्यागोष्टीचा मनात राग धरून अभिषेक ऊर्फ गोलू सिंग यांचे हातात असलेला लोखंडी रॉडने डोकीत उपट मारुन दुखापत केली तसेच शिवम (करुणेश) सिंग, सोएब खान व इतर 4 जण यांनी जमिनीवर खाली पाडून पोटावर, छातीवर, गुप्तभागावर पाठीवर लाथांनी व ठोश्याबुक्कयांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, ही घटना घडल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
Comments
Post a Comment