पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु : अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश

पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागु : अपर जिल्हादंडाधिकाऱ्याचे आदेश 


पालघर : पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून ) हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 1951 चे कलम ३७(१) (३) अन्वये पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस हद्दीत दिनांक ६/०६/२०२४ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक १९/०६/२०२४  रोजी २४ .00 वा. या कालावधीपर्यत मनाई आदेश लागू केले आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी पालघर सुभाष भागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोणताही दाहक पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे , दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे.

शिवाय, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करणे , गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे,तसेच ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल तसेच ज्यामध्ये राज्य उलथवुन टाकण्याची प्रवृति दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे किंवा विडंबन करणे तसेच अशी चित्रे, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे.अश्या बाबीसाठी मनाई आदेश करण्यात आली आहे.

कलम ३७(१) अंतर्गतचा हा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरिष्ठाचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वांमुळेला लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे. तसेच लग्नकार्यासाठी जमलेले लोक, प्रेतयात्रा व अत्यंसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका यांना लागु असणार नाही.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी