लोखंडी पान्याने डोक्यात वार ; भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची केली निघृणपणे हत्या
लोखंडी पान्याने डोक्यात वार ; भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची केली निघृणपणे हत्या
वसई : भररस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. आरती यादव (वय २०) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून, रोहित यादव (२९) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि न. ३२० / २०२४ भा. द वी कलम ३०२ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार अटक आरोपी रोहित यादव रा. हरयाणा व मयत मुलगी आरती यादव रा.उत्तर प्रदेश यांचे ०६ वर्षांपासूनचे प्रेम संबंध होते. आरोपी रोहित याने एक महिन्यांपूर्वी मयत मुलीस एका खाजगी कंपनीत कामाला लावले होते. तो तिला रोज कामावर सोडायचा. परंतु काही दिवासापूर्वी मयत मुलगी आरती यादव हिचे तिच्या कंपनीत एका मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याचे आरोपीला समजले व मयत मुलगीही आरोपी बरोबर बोलण्यास व फोन करण्यास टाळाटाळ करत होती याचा मनात राग येऊन या कारणावरून दी १८ जुन रोजी आरोपीने इंडस्ट्रियल पाना वापरून मयत आरती यादव हिच्या डोक्यात १२ ते १४ वेळा मारून तिचा खून केला. याबाबत गुन्हा नोंद झाला असून वाळीव पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे.
हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला. पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे सरला. आरती निपचीत पडली. तीने प्राण सोडले होते. मात्र रोहितमधला हैवान शांत झाला नाही. क्यूं किया क्यूं किया... असे म्हणत तो आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत होता. या सर्व घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवा अटक केली.
Comments
Post a Comment