तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका
तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका
तारापुर : दि.१४ जून रोजी विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, बोईसर यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, तारापुर पोलीस ठाणे हद्दीत कुरगांव रॉयल गार्डन, रुम क्रमांक १०२, ए विंग या सदनिकामध्ये एक महिला अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहीती मिळाली.
सदर माहीती प्राप्त होताच बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, बोईसर व तारापुर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या सह सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणाहुन १ पिडीत महिलेची सुटका करण्यात आलेली असुन १ महिला आरोपी हिच्या विरुध्द तारापुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.४०/२०२४ भादवि कलम ३७० सह अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे सपोनि/सागर कावळे, प्रभारी अधिकारी, तारापुर पोलीस ठाणे, संदीप कहाळे, सहा. पोलीस निरीक्षक तथा वाचक उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांचे कार्यालय, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/तांबडा मपोहवा/भुसारा, मपोना/टोपले, मपोना/चौधरी, पोना/अंभिरे, पोअं/वसावे पोअं/कुवरा, पोअं/मेहेरे, पोअं/खेडकर, पोअं/धानिवरे सर्व नेमणुक तारापुर पोलीस ठाणे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सागर कावळे, नेम. तारापुर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment