बोईसर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत ; पाच शाळकरी मुलांसह 22 नागरिकां वर केला जीवघेणा हल्ला
बोईसर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत ; पाच शाळकरी मुलांसह 22 नागरिकां वर केला जीवघेणा हल्ला
बोईसर : बोईसर परिसरात भटक्या कुत्र्यानी अक्षरशः हैदोस घातला आहे. गुरुवारी बोईसरमध्ये एकाच दिवसात २७ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानी चावा घेतला असून या सर्वांना बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे या हल्यांमुळे नागरिकां मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बोईसर शहरासह सरावली, नवापूर नाका, यशवंत सृष्टी, सरावली, खैरापाडा एमआयडीसी परिसर सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली सापडली आहेत. या भागांत भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या खुले आमपणे फिरत आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांकडून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लक्ष केलं जात आहे. शहरातील रस्ते चौक या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांचा हैदोस रोजरासपणे पाहायला मिळतोय. दिवसा आणि रात्री ही भटकी कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. आणि यातूनच नागरिकांवर हल्ले करून त्यांचे लचके तोडली जात आहेत. काल सायंकाळी शाळेतून घरी येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला तर संपूर्ण दिवसभरात 22 नागरिकांच्या वरती कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्याची माहिती सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी दिली आहे.
या भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी बोईसर सरावली, खेरापाडा ग्रामपंचायत प्रशासनाकडून श्वान पथक देखील नियुक्त करण्यात आले नाहीत. शहरातल्या भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत वारंवार नागरिकांकडून संबंधित प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी करण्यात येतात. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून भटकी कुत्री पकडण्यामध्ये हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment