वारांगडे येथे जागतिक पर्यावरण दिवशीच जिवंत झाडांची कत्तल
वारांगडे येथे जागतिक पर्यावरण दिवशीच जिवंत झाडांची कत्तल
बोईसर: ५ जुन जागतिक पर्यावरण दिवशीच मान ग्रामपंचायत हद्दीतील वारांगडे येथे गुरचरण जागेवरील जिवंत झाडांची कत्तल कऱण्यात आली आहे .
वारांगडे येथे आदिवासी लोकांची जागा परप्रांतीयांनी विकत घेऊन अनधिकृत बांधकाम करुन व्यवसाय करण्यासाठी त्या जागेत असण्याऱ्या झाडांची वन विभाग कडून कोणतीही परवानगी न घेता झाडे तोडण्यात आली आहेत.
झाड लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ जून महिना असतो. जून हा लागवडीचा सर्वोत्तम हंगाम त्याचबरोबर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्यात रोपांना भरपूर पाणी मिळते
त्यामुळे झाडांची खरी वाढ आणि जीवन पावसानंतर येते. म्हणून, झाडे लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे जून असतो
त्यामूळेच या कालावधीत झाडे तोडण्याची परवानगी दिली जात नसताना वारांगडे येथे झाडे तोडण्यात आली आहे .वृक्षतोड करून पर्यावरणाला हानी पोहचविले म्हणून जागा मालकावर व झाडाची कत्तल करण्यावर कठोर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची मांगणी पर्यावरण प्रेमींनी करुन असंतोष व्यक्त केला आहे .
Comments
Post a Comment