पालघर पोलीसाचा वेग वाढणार ; १७ वाहनांची पडली भर
पालघर पोलीसाचा वेग वाढणार ; १७ वाहनांची पडली भर
पालघर : पालघर पोलीस दलास दैनंदिन कामकाजाकरीता व कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याकरीता मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेकडून व जिल्हा नियोजन व विकास समितीकडून एकूण १७ वाहने मिळालेली आहेत.
त्यापैकी १ महिंद्रा एक्स्युची-७००, ४ महिंद्रा स्कॉर्पिओ, ४ मारुती ईको अशी एकूण ९ वाहने हे जिल्हा नियोजनकडून असून ३ टाटा बस व ५ बजाज पल्सर (दुचाकी) अशी एकूण ८ वाहने विकास समितीच्या प्राप्त निधीतुन मिळालेली आहे हे मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कडून मिळालेली आहेत.
सदर वाहनांचे उद्घाटन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे संपन्न झाले.
Comments
Post a Comment