*ग्रामीण डहाणू भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील स्थायी तालुका अध्यक्ष नेमा... ज्येष्ठ नेते मोईज शेख*
*ग्रामीण डहाणू भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील स्थायी तालुका अध्यक्ष नेमा... ज्येष्ठ नेते मोईज शेख* पालघर :डहाणू बाहेरच्या लहान लहान संघटना, डहाणू ग्रामीण क्षेत्रात येवून आपले राजकीय जाळे जोमाने विणत असताना डहाणू तालुक्यातील काँग्रेस अजून तालुक्यातील पाड्या पाड्यात पोहोचली नाही.कार्यकर्ते नवीन निर्माण झाले नाहीत. जुन्या कार्यकर्त्यांची हजेरी नगण्य अशी झाली आहे अश्या बिकट परिस्थितीत डहाणू काँग्रेस ची धुरा एका धुरंधर आदिवासी नेत्याकडे देणे अतिशय आवश्यक आणि महत्वाचे झाले आहे. जव्हार मोखाडा भागात बळवंत गावित यांच्या रूपाने एक नवीन खंबीर नेतृत्व उभे राहिले आहे,याची प्रचिती नुकतीच दिसून आली. प्रचंड जनसंपर्क व वेळप्रसंगी पक्षासाठी स्वखर्चाने कार्यक्रम यशस्वी करणारा एक सुशिक्षित आदिवासी नेता म्हणून जिल्ह्याला त्यांची ओळख झाली आहे.त्यांच्या नेतृत्वात संपत पवार हे यशस्वी जव्हार तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी झाले. परंतु डहाणू तालुक्याची परिस्थिती फार गंभीर आहे. तालुक्यात काँग्रेस केवळ औषधाला उरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.वास्तविक हा तालुका मंत्री पदे भोगलेल्यांचा तालु...