शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी फोन आल्यावर हॅलो ऐवजी 'वंदे मातरम' म्हणतील

 शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी फोन आल्यावर हॅलो ऐवजी 'वंदे मातरम' म्हणतील 

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी अमृत महोत्सवांतर्गत सरकारच्या विविध संस्था आणि विभागातर्फे  देशभरात नवनविन उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले.या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सांगितले की, सर्व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना कार्यालयात फोन आल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे लागेल. मग मोबाईल असो की फ़ोन आता फोन आल्यावर हॅलो ऐवजी देशभक्तो का गीत वंदे मातरम बोलावे हे अभियान सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी पर्यत करू.आपण स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षात प्रवेश करत आहोत. आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत त्यामुळे सर्व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना कार्यालयात फोन आल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे लागेल. याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. 18 ऑगस्टपर्यंत औपचारिक सरकारी आदेश येईल, असे ते म्हणाले. पुढील वर्षी २६ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी 'वंदे मातरम' म्हणावे, असे मला वाटते.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी 20 सदस्यीय राज्य मंत्रिमंडळाच्या खात्यांचे वाटप केले. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन, मत्स्यविकास आणि सांस्कृतिक कार्य ही खाती देण्यात आली आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नवा फर्मान काढला आहे. आता सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम बोलणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावर त्यांचे म्हणणे आहे की हॅलोसारखे शब्द परकीय आहेत. म्हणून, हे शब्द टाकून देणे आवश्यक आहे. ते म्हणतात की वंदे मातरम् हा केवळ एक शब्द नसून प्रत्येक भारतीयाची भावना आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी