*ग्रामीण डहाणू भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील स्थायी तालुका अध्यक्ष नेमा... ज्येष्ठ नेते मोईज शेख*

 *ग्रामीण डहाणू भागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील स्थायी तालुका अध्यक्ष नेमा... ज्येष्ठ नेते मोईज शेख*


पालघर :डहाणू बाहेरच्या लहान लहान संघटना, डहाणू ग्रामीण क्षेत्रात येवून आपले राजकीय जाळे जोमाने विणत असताना डहाणू तालुक्यातील काँग्रेस अजून तालुक्यातील पाड्या पाड्यात पोहोचली नाही.कार्यकर्ते नवीन निर्माण झाले नाहीत. जुन्या कार्यकर्त्यांची हजेरी नगण्य अशी झाली आहे अश्या बिकट परिस्थितीत डहाणू काँग्रेस ची धुरा एका धुरंधर आदिवासी नेत्याकडे देणे अतिशय आवश्यक आणि महत्वाचे झाले आहे. जव्हार मोखाडा भागात बळवंत गावित यांच्या रूपाने एक नवीन खंबीर नेतृत्व उभे राहिले आहे,याची प्रचिती नुकतीच दिसून आली. प्रचंड जनसंपर्क व वेळप्रसंगी पक्षासाठी स्वखर्चाने कार्यक्रम यशस्वी करणारा एक सुशिक्षित आदिवासी नेता म्हणून जिल्ह्याला त्यांची ओळख झाली आहे.त्यांच्या नेतृत्वात संपत पवार हे यशस्वी जव्हार तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी झाले. परंतु डहाणू तालुक्याची परिस्थिती फार गंभीर आहे. तालुक्यात काँग्रेस केवळ औषधाला उरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.वास्तविक हा तालुका मंत्री पदे भोगलेल्यांचा तालुका. पण त्यांच्याही काळात काँग्रेस ला पाहिजे तशी उंची गाठता आली नाही.

डहाणू परिसरातील धनाढ्य लोकांनी आपल्या मंत्री महोदयांच्या सहकार्याचा पुरेपूर वैयक्तिक फायदा करून घेतला.पक्ष वाढला नाही.आताची स्थिती अशी आहे की,आताच्या प्रभारी तालुका अध्यक्ष यांच्या मनमानी स्वभावाला कंटाळून कित्येक जुन्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन डहाणू येथे कित्येक वर्षे पाय ठेवलेला नाही. आदिवासी ग्रामीण भागात एकही मोठी जाहीर सभा झाली नाही.पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सोडा, एकही ग्रामपंचायत डहाणू येथे काँग्रेस ने स्वबळावर जिंकलेली नाही.उलट अगोदरच समोरून जावून हाथ मिळवणी करण्याचा पायंडा तालुक्यात पाडण्यात आला आहे. आता ही एक तालुक्यात नवीच प्रवेश केलेल्या संघटने कडे काही फेऱ्या मारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेस च्या कठीण काळात काँग्रेस चा संपर्क घरोघरी वाढला पाहिजे असताना, डहाणूत मात्र वेगळे चित्र आहे. कार्यालयाच्या बाजूला कार्यकर्त्यांची घरे असताना सभेच्या सूचना जात नाहीत.कार्यकर्त्यांशी सुसंवाद नाही. अनुभवी नेत्याची मते विश्वासात घेतली जात नाहीत. त्यामुळे एक चैतन्य निर्माण करणेसाठी प्रभारी तालुका अध्यक्षाच्या जागी त्वरित नवीन स्थायी अध्यक्ष आदिवासी समाजातून नेमणे गरजेचे आहे.विद्यमान प्रभारी तालुका अध्यक्ष प्रकृती अवस्थेमुळे सुद्धा हवालदिल झाले असल्याचे बोलले जाते. डहाणू तालुका क्षेत्रफळ मोठे आहे. संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढायला तरुण तडफदार अध्यक्षांची नितांत गरज आहे.

कासा, चारोटि, तवा या भागातील बरेचसे जुने कार्यकर्ते अध्यक्षपदा साठी उत्सुक आहेत व चांगले निवडणूक परिणाम देण्यासाठी पक्षाला बाधील आहेत.पक्षाने योग्य तो अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कडून घेवून त्वरित पावले उचलावीत आणि डहाणू चा ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करावा अशी मागणी कार्यकर्त्याकडून होत आहे.कार्यकर्त्यांची ही खंत लवकरच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या दरबारात मांडणार असल्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईज शेख यांनी बोलताना सांगितले.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी