कै. हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
कै. हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
पालघर : कै. हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर, तर्फे कै. सौ. प्रिया प्रवीण संखे यांच्या स्मरणार्थ पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील मुकबधिर बाल विकास केद्रे डहाणु येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी प्रॅक्टिकल बुक्स व कंपास पेटी या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.हेमंत संखे शिक्षण संस्था बोईसर या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण संखे यांनी केले होते यामध्ये 90 विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण संखे , प्रमुख पाहुणे श्री रामसिंग ठाकूर , श्री अजय चौबे , श्री राजेश यादव व श्री राजेश लाटा या मान्यवरांच्या हस्ते अपंग मुक बधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक दाभाडे सर व शाळेचे शिक्षक वर्गही उपस्थित होते.
Comments
Post a Comment