स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने बोईसर मध्ये नमो नमो मोर्चा भारत तर्फे भव्य रॅलीचे आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने बोईसर मध्ये नमो नमो मोर्चा भारत तर्फे भव्य रॅलीचे आयोजन
पालघर :देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी अमृत महोत्सवांतर्गत सरकारच्या विविध संस्था आणि विभागातर्फे देशभरात घरोघरी जाऊन लोकांना तिरंगा विषयी जागरूक करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, नमो नमो मोर्चा भारत तर्फे बाईक तिरंगा यात्रा काढून तिरंगा फडकवत देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
ही बाईक रॅली बोईसर धोड़ीपूजा कार्यालया पासून सुरू होऊन टॅप्स गेट समोर संपली.यात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिवस म्हणून साजरा करत, वंदे मातरम, जय हिंद, जय भारतच्या घोषणा देत राष्ट्रध्वजाला वंदन करत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या प्रदीर्घ रॅलीमध्ये घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
यात नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्य प्रकाश सिंह, संघटन महामंत्री व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सोपान उंडे पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते मनोज मिश्रा, राष्ट्रीय मंत्री आर.बी.सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईक रॅली यात्रा महाराष्ट्र राज्य सह-संयोजक वैभव घोसाळकर,महाराष्ट्र राज्य संयोजिका पायल जैन, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रदीप सिंह, जिल्हा संघटन महामंत्री अखिलेश पांडे, जिल्हा संघटन मंत्री दिनेश पाठक, जिल्हा युवा अध्यक्ष अखिलेश चौबे, जिल्हा महिला संयोजिका रचना मकवाना, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमरेंद्र चौधरी, जिल्ह युवा विधी सल्लागार सौरभ पांडे पदाधिकारी व हिंदू परिषदेचे अध्यक्ष एस पी सिंग जी, बोईसर ब्लॉक बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंग, रवी सिंग, अरविंद सिंग नमो नमो मोर्चा भारतचे पदाधिकारी, पत्रकार-ओमप्रकाश द्विवेदी,अजित सिंह,प्रमोद तिवारी उपस्थित होते सदर रॅली पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आली.
Comments
Post a Comment