तारापूर येथे देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात व उत्साहात साजरा
तारापूर येथे देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात व उत्साहात साजरा
पालघर :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले.पालघर जिल्ह्यातील तारापुर येथे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तारापूर ग्रामपंचायतीने गावात १३,१४,व १५ ऑगस्ट तीन दिवस अमृत महोत्सव थाटात व उत्साहात साजरा केला .15 ऑगस्ट रोजी मोहम्मदी उर्दू शाळा,न्यूक्लियर फ्रेंडस् इंग्लिश शाळा, रा.ही.सावे विद्यालय जि.प.ऊर्दू शाळा या शाळेतील विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली.
अमृत महोत्सवाची ही रँली प्रत्येक मोहल्यातून पारशी आळी तून पाड्यापाड्यातून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येऊन सामुदायिक झेंडा वंदन करण्यात आले.
या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी 15ऑगस्ट रोजी झेंडावंदन माजी सैनिक प्रताप सावे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीच्या अध्यक्षा गितांजली सावे, माजी सरपंच कल्पेश उंबरे, ग्रामविकास अधिकारी कमळाकर नाईक ,गणेश दवणे ,शुभांगी कूट्टे, राजेश कूट्टे, मोहम्मदवाला ट्रस्ट चे सेक्रटरी नासिरूद्दीन सोपारकर, सुनिता राजड,स्मिता पवार सलीम गवंडी,मोहम्मद उर्दू शाळेचे प्रिन्सिपल हमीदुल हसन सर, शकिल असार ,,शब्बीर (बल्लू) गुल्ली,विनायक जाधव, संतोष पाटील,पराग सावे,नरेश पाटील, रा.ही.सावे विद्यालयाचे मगन वळवी, जैतकर सर, वंदना सावे , प्रभाकर पाटील, न्यूक्लियर फ्रेंड्स इंग्लिश शाळेचे संख्ये सर ,नासिर कौलारीकर,वंसत पाटिल ,जगदीश पाटील,सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सामुदायिक झेंडावंदनानंतर अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीला ज्या दानशूर व्यक्तींनी मदत केली त्यांचा गौरव करण्यात आला
तर १४ ऑगस्ट रोजी तारापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे झेंडावंदन श्रेष्ठ व जेष्ठ नागरीक (वय ९६ वर्ष) असलेले अब्दूल लतीफ समसुद्दीन गवंडी यांच्या हस्ते करण्यात आले .
13ऑगस्ट रोजी तारापूर येथील मोहम्मद उर्दू शाळा, न्युक्लियर फ्रेण्डस् इंग्लिश शाळा,व रा.ही.सावे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून , घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयावर झेंडावंदन सामाजिक कार्यकर्ता ज्येष्ठ नागरिक श्रीमती राधिका बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. तर मोहम्मदी उर्दू शाळेत 13 आॅगस्ट रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षा गीतांजली सावे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तर 14 ऑगस्ट रोजी कौसरजहाँ नसरुद्दीन सोपारकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तसेच 15 ऑगस्ट रोजी लायन्स क्लब तारापूर अध्यक्षा इंदुमती कतियान यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास तारापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कमळाकर नाईक बचत गट प्रतिनिधी अंगणवाडी कार्यकर्ता शिक्षक वर्ग व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले .
14 ऑगस्ट 1942 रोजी चले जाव चळवळीचा आंदोलनात ब्रिटिशांनी अमानुष गोळीबार केला पालघर मधील पाच स्वातंत्र्य सैनिकांना वीरमरण आले यातील हुतात्मा रामचंद्र चूरी (मुरबे )हुतात्मा सुकूर मोरे (सालवड) हुतात्मा गोविंद ठाकूर (नांदगाव) हुतात्मा काशिनाथ पागधरे (सातपाटी) हुतात्मा रामप्रसाद तिवारी (पालघर) या स्वातंत्र्यवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यासाठी तारापूर किल्ला ते सालवड आणि मूरबे ते सालवड अशी रॅली काढण्यात आली यावेळी सालवड गावातील हुतात्मा स्मारक येथे शेकडो नागरिक एकत्र आले होते शूर स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्यासाठी हुतात्मा स्मारक क्रांतीज्योत समिती तारापूर बोईसर च्या वतीने आयोजित रॅली त अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment