डंपरचा ब्रेक फेल होऊन सहा वाहनाना धडक
डंपरचा ब्रेक फेल होऊन सहा वाहनाना धडक
पालघर : पालघर शहरात भरधाव डंपरचा ब्रेक फेल होऊन सहा वाहनाना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी पालघर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये दुपारी मनोरहुन पालघरच्या दिशेने येणाऱ्या डंपरने एक टेम्पो, एक रिक्षा, तीन कार व एक दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दोन विद्यार्थी सह एक दुचाकीस्वार ही जख़्मी झाला.
या घटने मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी तीन जण जख़्मी झाले असून या अपघातात सर्व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहेत.तसेच डंपर चालकाला पोलीसानी ताब्यात घेऊन वाहतुक कोंडी ही लवकर सुरळीत करण्यात आली.
Comments
Post a Comment