वसईतील भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार एसीबी जाळ्यात
वसईतील भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार एसीबी जाळ्यात
पालघर :वसई भुमी अभिलेख कार्यालयातील,वर्ग -3 चे शिरस्तेदार, राजेंद्र महादेव संखे,रा - बोरीवली 2) कैलास वासुदेव जोगी वय -42 वर्ष (खाजगी इसम ) रा - नालासोपारा 3) रमण जयवंत गोली वय - 50 वर्ष रिक्शाचालक ( खाजगी इसम ) रा - नालासोपारा यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक, पालघर पथकाने ताब्यात घेतले आहे.
दिनांक 22/08/2022 रोजी तक्रारदार वय - 44 वर्ष यांचे सासरे यांच्या जमिनीचे शासकीय मोजणी चे कागदपत्रे मिळण्यासाठी तसेच मोजणीचे रिपोर्ट कोर्टात सादर करण्यासाठी आरोपी कैलास जोगी यांनी राजेंद्र संखे यांच्याकरीता तक्रारदार यांच्याकडे 50,000/- रु लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पालघर येथे तक्रार दिली.
सदर पडताळणीत तडजोडी अंती 45,000/-रु लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे व त्यासाठी राजेंद्र संखे यांनी त्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार दिनांक 23/08/2022 रोजी सापळा रचुन आरोपी कैलास जोगी व आरोपी रमण गोली यांना पंचासक्षम 30,000/- रु लाच घेताना रावजी चहा सेंटर, गौराई पाडा नाका, नालासोपारा पूर्व येथे रंगेहाथ पकडण्यात आले. यात सर्व आरोपीना ताब्यात घेवून पुढील कारवाई चालू आहे.
सदरची कारवाई मा. श्री पंचाबराव उगले पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, श्री अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ जगताप पोलीस उपअधीक्षक, स्वपन बिश्वास पोलीस निरीक्षक, पोहवा - संजय सुतार, अमित चव्हाण, विलास भोये, नितिन पागधरे, निशा मांजरेकर, पोना - दिपक सुमडा, सखाराम दोडे, स्वाती तारवी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment