मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेल, वरळी युनिटने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश

  मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेल, वरळी युनिटने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश 

मुंबईत 1400 कोटीचे ड्रग्स जप्त, तब्बल 700 किलो पेक्षा जास्त मेफेड्रॉन साठा पकडला 


पालघर:पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील औषध निर्मिती युनिटवर मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेल, वरळी युनिटने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.यात १४०० कोटी रुपये किमतीचे ७०० किलो पेक्षा जास्त मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अँटी नार्कोटिक्स सेलने पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) या युनिटवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.

     विशेष माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं समजल आहे.एएनसीच्या पथकाने या परिसरावर छापा टाकला आणि त्यादरम्यान तेथे प्रतिबंधित औषधं मेफेड्रॉन तयार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर नालासोपारा येथे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे.

शहर पोलिसांनी अलीकडच्या काळात केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. मेफेड्रॉनला 'म्याऊ म्याऊ' किंवा एमडी असेही म्हणतात. नॅशनल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यानुसार त्यावर बंदी आहे.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी