विजेचा पोल अंगावर पडून एक गंभीर जखमी

 विजेचा पोल अंगावर पडून एक गंभीर जखमी


पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापुर एम.आय.डी सी त कोलवडे नाका येथे विजेचा लोखंडी पोल अंगावर पडून दुचाकीस्वार योगेश कांतीलाल पागधरे वय- 35 वर्ष रा- नवापुर, हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

     दिनांक 9/08/2022 रोजी सकाळी  9 वाजता तारापुर एम.आय.डी.सी मधील कोलवडे नाका इथे नवापुर येथून एम.आय.डी.सी मधील टाटा स्टील कंपनीत कामावर जात असताना दुचाकीस्वार योगेश पागधरे यांच्या वर रस्त्यालगत असलेला लोखंडी पोल अंगावर पडून गंभीर जखमी झाला आहे.तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषित कारखान्यांमुळे व महावीतरण कंपनीकडून नादुरुस्त खांबाची नियमित डागडुजी न केल्यामुळे हा अपघात झालेला असून महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडली अस सांगण्यात येत आहे.

सदर अपघाताची बातमी कळताच पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घडलेल्या अपघाताची पाहणी करत गंभीर जखमी झालेल्या योगेश पागधरे याला पुढील उपचारासाठी तुंगा इस्पितळातून मुंबई येथील येथे नेण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे प्रथम उपाध्यक्ष सचिन पाटील, जेष्ठ शिवसैनिक रामकृष्ण तांडेल, आलेवाडी शाखाप्रमुख राजेंद्र वाडीकर उपस्थित होते.

◾ वैभव संखे - शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख:

महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध काम केले असते तर अशा घटना टाळू शकतात. योगेश पागधरे यांची प्रकृती चिंताजनक असून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पागधरे यांच्यावर होणाऱ्या उपचारांसठी खर्च करणार असल्याचे सांगितले असून योगेश पागधरे यांच्या उपचारासाठी शिवसेना सदैव तत्पर आहे. 

◾ राठोड- उप कार्यकारी अभियंता तारापूर औद्योगिक क्षेत्र:

पावसाळ्यापूर्वी त्या खांबाची डागडुजी केली होती.वादळी पावसामुळे स्टे रॉड तुटून खांब हळूहळू पडत नेमका दुचाकीस्वार योगेश पागधरे यांच्यावर पडला झालेल्या घटनेबाबत महावितरण कंपनीला अतिशय दु:ख असून गेल्या पाच वर्षांत या विभागातील हि पहिली घटना आहे. 

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी