स्वातंत्रदिनी ध्वजारोहणासाठी 19 जिल्ह्याना 19 मंत्री, इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण
स्वातंत्रदिनी ध्वजारोहणासाठी 19 जिल्ह्याना 19 मंत्री, इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण
मुख्यमंत्र्याचे अप्पर मुख्य सचिव भुषण गगराणी यांनी राज्यात येत्या स्वातत्र्यदिनी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाबाबत राज्य शासनाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कुणाच्या हस्ते, कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण होणार याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे देण्यात आले आहेत.
त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नागपुर, सुधीर मनगुटीवार -चंद्रपुर, चद्रकांत पाटील -पुण्यात, राधाकृष्ण विखे पाटील -अहमदनगर, गिरीश महाजन -नाशिक, दादाजी भूसे -धुळे, गुलाबराव पाटील -जळगाव, रविद्र चव्हाण - ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर, दीपक केसरकर - सिंधुदुर्ग, उदय सामंत -रत्नागिरी, अतुल सावे - परभणी, संदीपान भूमरे - औरगाबाद, सुरेश खाडे -सांगली, विजयकुमार गावीत - नंदुरबार, तानाजी सावंत - उस्मानाबाद, शंभुराज देसाई -सातारा, अब्दुल सत्तार -जालना, संजय राठोड - यवतमाळ, विभागीय आयुक्त -अमरावती आणि कोल्हापुर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, वाशीम, बुलढाणा, पालघर, नांदेड़ या जिल्ह्यान मध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार असे मुख्यमंत्री महोदयाचे आदेश आहेत.
Comments
Post a Comment