लाच मांगणी प्रकरणी प्रभारी सहाय्यक आयुक्त व कनिष्ठ अभियंता ACB च्या जाळ्यात

 लाच मांगणी प्रकरणी प्रभारी सहाय्यक आयुक्त व कनिष्ठ अभियंता ACB च्या जाळ्यात

पालघर :वसई विरार शहर महानगरपालिका एफ विभाग पेल्हार प्रभाग समिती, प्रभारी सहाय्यक आयुक्त रुपाली राजेंद्र संखे वय- 55 वर्ष, कनिष्ठ अभियंता हितेश विनायक जाधव वय 30 वर्ष व गणेश प्रल्हाद झनकर - मजूर (कंत्राटी) यांना लाच मांगण्या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे पथकाने ताब्यात घेतले आहे.

  सदर तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून तक्रारदार व त्याचा भाऊ यांनी झावरपाडा, नालासोपारा येथील दुकानाचे दुरुस्ती व उंची वाढविण्याचे काम घेतले होते. सदर बांधकामावर कारवाई करुन ते निष्कासित न करण्या करीता लोकसेविका रुपाली संखे यांनी तक्रारदार यांचे कडे 50,000/-रूपये लाचेची मांगणी करीत असल्याबाबत दिनांक 16 /06/2022 रोजी रीतसर तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषगाने दिनांक 17/06/2022 रोजी केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान लोकसेविका संखे यांनी 40,000/- रु स्वीकारण्याचे मान्य करुन सदरची रक्कम कार्यालयात हजर असलेल्या गणेश झनकर यांचे कडे देण्याचे सांगितले. गणेश यांनी 18/06/2022 रोजी व 21/06/2022 रोजीचे सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार व त्याच्या भावा कडून लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन स्विकारण्याचा प्रयन्त केला सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन लोकसेविका रुपाली संखे व हितेश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.श्री. डॉ पंजाबराव उगले, सौ पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्यूरो ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका