*नमो-नमो मोर्चातर्फे रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रियांशू संजीव सिंग यांना सन्मानचिन्ह*
*नमो-नमो मोर्चा भारत तर्फे रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रियांशू संजीव सिंग याला सन्मानचिन्ह*
पालघर :दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी नमो नमो मोर्चा भारत यांच्या बोईसर येथील कार्यालयात इंडो नेपाल इंटरनेशनल चैंपियनशिप मध्ये प्रियांशु संजीव सिंह याने रौप्य पदक जिंकले याबद्दल नमो नमो मोर्चा भारत तर्फे त्याला शुभेच्छा व सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला.
युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित, नेपाळ वॉर गेम्स डेव्हलपमेंट द्वारे युथ गेम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन करण्यात आले होते. जे रंगशाला स्टेडियम पोखरा नेपाळमध्ये 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यात यूथ इंटरनेशनल चैंपियनशिप मध्ये महाराष्ट्रतुन प्रतिनिधित्व करुन प्रियांशु संजीव सिंह याने 17 वर्षाखालील वयोगटात 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धत रौप्य पदक पटकावले आहे तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील एका छोट्याशा वस्तीत राहणाऱ्या प्रियांशु सिंह ने आपल्या वस्तीचे, गावाचे, शहराचे, तसेच देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यामुळे ही एक कौतुकाची गोष्ट आहे आणि अश्याच तरुण युवकाना प्रोत्साहित करण्यासाठी नमो नमो मोर्चा भारत तर्फे प्रियांशु सिंह याला सन्मान चिन्ह दिले व त्याचे वडिल संजीव सिंह याना शाल देण्यात आली.
यावेळी नमो नमो मोर्चा भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह, राष्ट्रीय मंत्री अरविंद सिंह, जिल्हा संघटन सरचिटणीस अखिलेश पांडे, जिल्हा युवा अध्यक्ष अखिलेश चौबे, जिल्हा संघटनेच्या महिला अध्यक्षा शोभा श्रीवास्तव, जिल्हा युवा उपाध्यक्ष कुंदन सिंह, जिल्हा युवा प्रभारी अनिस सिंह, जिल्हा युवा विधि सल्लागार सौरभ पांडे, करण सिंह व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment