स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाम गावात सामुहिक राष्ट्रगीत गायन संपन्न !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाम गावात सामुहिक राष्ट्रगीत गायन संपन्न !
बोईसर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पालघर जिल्ह्यातील पाम गावात आनंदी आळी विभागातील महिलांनी एकत्र येऊन सामुहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम राबविला.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण होणाऱ्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये स्वराज्य महोत्सव चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.हे उपक्रम राज्य /जिल्हा /तालुका व ग्राम स्तरावर निश्चित केले.आज 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एकाच वेळी राज्यातील अनेक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आणि जे नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवुन या उपक्रमात सहभाग व्हावे असे आव्हान करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पाम गावातील महिलानी एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment