वारांगाड्यात आदिवासींच्या जमीनीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण !
वारांगाड्यात आदिवासींच्या जमीनीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण !
खोल्या व गाळ्यांचा बांधकाम करत मोठ्या चाळीचे निर्माण !
तलाठी साधना चव्हाण यांनी केली तहसीलदार सुनील शिंदे कडे कारवाईची मागणी !
बोईसर: मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मान जवळील मौजे वारांगडे सर्वे क्रमांक - ८१, ८२, ८५, ९७, ३४, ३५, ३१, ५२ ,२५, व २७ या आदिवासी लोकांच्या जमिनीवर मुन्ना तिवारी, प्रमोद सिंग, शिवशंकर यादव, जगदीश पन्नालाल विश्वकर्मा, मोहन पन्नालाल विश्वकर्मा, सलिम मनिहार , प्रमोद सिंग, मारूफ खान, बबलू खान, या परप्रांतीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर खोल्या व चाळीचे बांधकाम करून विकण्याचे काम करत आहेत.
सदर भूखंड आदिवासी लोकांना शेतीसाठी वाटप केलेला असून दिवसेंदिवस जमिनीचे वाढते भाव पाहता अशिक्षित आदिवासी लोकांची फसवणूक करत परप्रांतीय लोकांनी नोटरी करून जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्याचे देखील दिसून येत आहे.
बोईसर मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी सजा मान येथिल तलाठी साधना चव्हाण यांनी सदर बांधकामाची पाहणी करत पंचनामे तयार करून सदर बांधकामांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार सुनील शिंदे यांना अहवाल सादर केलेला असून काही महिन्यांपूर्वी तहसीलदार शिंदेंनी हातोडा मारलेल्या बांधकामांवर पुन्हा एकदा नव्याने बांधकाम करून तहसीलदार शिंदेंनी हातोडा मारलेल्या बांधकामांना परवानगी दिली आहे का असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.
Comments
Post a Comment