स्वतंत्रता दिवस निमित्ताने मुस्लिम समाजाकडून तिरंगा पदयात्रा
स्वतंत्रता दिवस निमित्ताने मुस्लिम समाजाकडून तिरंगा पदयात्रा
पत्रकार इल्यास पठाण व आशाद शेख यांनी घेतला पदयात्रेसाठी पुढाकार
बोईसर :भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिना निमित्ताने पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात मुस्लिम समाजाकडून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा जामा मस्जिद ते नवापुर नाका दुपारी 3.30 वाजता घोषणा देत काढण्यात आली या पदयात्रेच नेतृत्व खबरदार न्यूज़ चे संपादक इल्यास पठाण व जगत भारती चे संपादक आशाद शेख यांनी केल
तसेच या पदयात्रेत शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वैभव संखे व हेमंत संखे यांनी ही सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमात शमीम शेख, अल्ताफ शेख, इकबाल मेमन, मुस्कान मेमन, आरिफ तुरीया, यूसुफ शेख, अयूब पठाण, मुकर्रम खान, राहिल पठाण, सोजेफ शेख, इरफान खान, जमीर शेख, तन्वीर सिद्दिकी, रहिम पठाण, अब्बास राठी असे बहुसंख्य लोक उपस्थित होते .तसेच या कार्यक्रमाला बृजेश पाठक, सुशील (बबवा), आशीष पिल्ले व निशा यांचे सहकार्य लाभले.
या राष्ट्रध्वज तिरंगा पदयात्रेत शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वैभव संखे व हेमंत संखे यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाला सहकार्य केल्याबाबत मुस्लिम समाजाकडून आभार व्यक्त केलेले असून बोईसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment