स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विक्रमगड तालुक्यात पत्रकार संघातर्फे राबविला उपक्रम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विक्रमगड तालुक्यात पत्रकार संघातर्फे राबविला उपक्रम
स्वराज्य तोरण ट्रस्टच्या वतीने विक्रमगड तालुक्यात विद्यार्थ्यांना वहया तर शिक्षकांना राष्ट्रध्वज तिरंगा वाटप
पालघर :75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विक्रमगड तालुक्यात साखरा ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा पाटील पाडा,कोंबपाडा, चिंचपाडा येथे स्वराज्य तोरण चैरिटेबल ट्रस्टचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवार दिनांक 12/08/2022 रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणुन वहया तसेच शिक्षकांना राष्ट्रध्वज तिरंगाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विक्रमगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हनुमंतराव दोडके यांनी गटशिक्षणाधिकारी पवार यांच्या सहकार्याने यशस्वीपणे कार्यक्रम करण्यात आला.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस डॉ. किशोर बळीराम पाटील, प्रेस क्लब भिवंडी चे अध्यक्ष संतोष चव्हाण,पत्रकार संघाचे पालघर जिल्हाध्यक्ष विकास पाटील, पालघर जिल्हा सचिव तसेच पालघर सतर्क चे संपादक सुशांत संखे, पत्रकार संघाचे सदस्य तसेच क्राईम अलर्ट चे संपादक स्वप्निल पिंपळे, अखिलेश चौबे, अनिल मिश्रा, संघाचे भिवंडी ग्रुप अध्यक्ष आचार्य सुरज पाल यादव, सदस्य तथा भिवंडी पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ ठाकरे, कोमल समाचार चे संपादक श्रीनिवास सिरीमल्ली, आदी मान्यवर शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment