शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव संखे कडून मदतीचा हाथ

 शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव संखे कडून मदतीचा हाथ 


पालघर : विद्युत प्रवाह वाढल्याने शॉर्ट सर्किट होऊन भीषण आगीत संपूर्ण घर जळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे गोर्हे गावात  गाडेकर परीवाराचे चौघे भाऊ , एकाच घरात चार खोल्या मध्ये राहत असताना यांच्या घराला रात्री अचानक विद्युत प्रवाह वाढल्याने शॉट सर्किट होऊन भिषण आग लागली. यात गाडेकर कुटुंबांचे सपुर्ण घर त्या आगीत जळुन खाक झाले.सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी प्रचंड प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

हि माहिती  शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख  वैभव संखे यांना कळताच यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिडीत कुटुंबातील सदस्यांची भेट घेत त्यांना मदत करुन आधार दिला व त्यांनी सांगितले की,शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे की राजकारणा पेक्षा समाज हिताच्या दृष्टीने अधिक काम करा,पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी देखील राज्याचा राजकीय घडामोडी कडे लक्ष न देता प्रत्येक शिवसैनिकांने समाजाच्या सुख दुःख साठी धावुन गेले पाहिजे व शिवसेना पक्ष कायम आपल्या सोबत असुन कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास हक्काने आवाज द्या असेही ते यावेळी बोलताना सांगण्यास विसरले नाहीत.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्षा वैद्यहीवाढाण यांनी संपूर्ण घटनेची माहिती विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली व तातडीने पंचनामे करण्याचे सुचना दिल्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा  ज्योती ठाकरे यांनी सांगितले की जो पर्यंत या कुटुंबाला शासनाच्या वतीने व विद्युत मंडळाच्या वतीने मोठी आर्थिक मदत केली जात नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत,आपण कधीही आम्हाला फोन करा शिवसेना तातडीने धाव घेईल.

यावेळी  जिल्हा प्रमुख  वैभव संखे, जिल्हा परिषद अध्यक्षा  वैद्यही वाढाण, महीला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा  ज्योतीताई ठाकरे,उपजिल्हा प्रमुख  राजाभाई जाधव विक्रमगड विधानसभा अध्यक्ष  प्रल्हाद कदम, मोखाडा माजी सभापती  प्रदीप वाघ, योगेश गवा,  अरुण अधिकारी, सतिश चौधरी,  अंजली चौधरी, संजय अगिवले,  प्रमोद पाटील, कैलास पाटील ,अजित ठाकरे, संदीप पाटील, प्रथमेश ठाकरे, सुरेश जाधव, अभिजित शिर्के, निखिल देहरकर, शिवाजी चौबल, नामदेव चौबल इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी