10,000 रुपयाची लाच मांगणाऱ्या कृषि तालुका अधिकारी ACB च्या जाळ्यात
10,000 रुपयाची लाच मांगणाऱ्या कृषि तालुका अधिकारी ACB च्या जाळ्यात पालघर मध्ये लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई पालघर :कृषि तालुका अधिकारी संतोष एकनाथ पवार (वय 34) तालुका कृषि अधिकारी कार्यालय,डहाणु ता.डहाणु ,जि.पालघर, (लोकसेवक )वर्ग- 2 यांच्यावर लाच लूचपत प्रतिनिबंधक विभागानी लाचेची मांगणी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यातील संतोष पवार यांनी सदर तक्रारदारा कड़े त्यांचे कृषि केन्द्रावर खरेदी- विक्री केलेल्या खत, बियाणे यांची काही ऑनलाइन नोंदी केली नसल्याने कारणावस्त तक्रारदार यांचे विरुद्ध कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचेकड़े 10,000 रु लाचेची रक्कमेची मांगणी केली होती.परंतु तडजोडी अंती 7000 रु देण्याची ठरले पण तक्रारदार यांना संतोष पवार ला पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार याने ला.प्र.वि पालघर येथे तक्रार केली. अंती 7000रु घेताना संतोष पवार यांना कृषि अधिकारी कार्यालय, डहाणु येथे 28 जून 2022 रोजी रंगेहाथ पंचासमक्ष पकड़ण्यात आले.