खुनी हल्ला करणारा अमोल मोरे फरार

 खुनी हल्ला करणारा अमोल मोरे फरार 

क्राइम अलर्ट :स्वप्निल पिंपळे 



बोईसर :तारापूर पोलिस ठाणे हद्दीत पोफरण गांवात मंगळवार दिनांक १४ जून रोजी रात्री ९ च्या दरम्यान नचिकेत आरेकर नावाच्या व्यक्तीवर तेथील राहणारा अमोल संतोष मोरे व अन्य चार जणांच्या मदतीने नचिकेत आरेकरवर लोखंडी रॉडने आत्मघाती हल्ला करत जबरन मारहाण केली आहे.

त्या मारहाणीत नचिकेतच्या डोक्यावर,पाठीवर तसेच हातावर गंभीर दुखापत झाली आहे त्याचा बोईसर येथील शिंदे इस्पितळात उपचार चालू आहे.

अणुऊर्जा प्रकल्पात कंत्राटी पद्धतीवर चार चाकी गाडीवर चालक म्हणून काम करणारा अमोल संतोष मोरे कामांवर असताना अणुऊर्जा प्रकल्पात कार्यरत असलेली मारूती कंपनीची चार चाकी (स्वीफ्ट डिझायर) गाडी क्रमांक एम एच ४८ सी बी ००२९ गाडीत आपल्या चार मित्रांना घेऊन  नचिकेत आरेकरवर खुनी हल्ला करणारा अमोल मोरे सकट चार अन्य आरोपी फरार आहेत.



सदर प्रकरणाचा तपास तारापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव करत असून त्यांनी सर्व आरोपीनवर कलम ३२४, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरीही फरार आरोपी अमोल मोर व त्याच्या चार मित्राचा  शोध वेगाने सुरू  आहे असे पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी