उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांची प्रदूषित कंपनी विरोधात धड़क कार्यवाही
उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांची प्रदूषित कंपनी विरोधात धड़क कार्यवाही,केमिकल झोन मधील चेंम्बर केले सील
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, तारापुर तर्फे प्रदुषण कमी करण्या करिता बरेच उपाय योजना करण्यात येत असतात.परंतु औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण मात्र कमी होताना दिसत नाही.
तारापुर हे एक मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याकारणाने अनेक प्रकारच्या उत्पादनातून प्रदुषण देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत असते. यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण नेहमीच प्रदुषण कमी व्हावे या साठी नेहमीच प्रयत्न करत असतात.परंतु जास्तीत जास्त प्रदुषण हे पाण्याने होताना दिसते.त्या मुळे पर्यावरण तर ख़राब होतेच. परंतु आजू बाजु च्या गावानाही यांचा परिणाम भोगावे लागत आहे
नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच स्थानिक लोकांच्या जमीनी ची गुणवत्ता ही ख़राब होते व समुद्रात सोडण्यात येणारे पाण्यामुळे समुद्राचे पाणी ही दूषित होते त्या मुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी टी. इ. पी.एस ला सांगून चोरीच्या पद्धतीने दुषित पाणी चेम्बर द्वारे समुद्रात सोडणारे कंपनीना आळा घालण्यासाठी केमिकल झोन मधील कंपनीच्या बाहेर असण्याऱ्या चेम्बर मध्ये मातिच्या गोणी टाकून बंद करण्याच काम चालू आहे. याने ज्या कंपनी केमिकल युक्त पाणी ट्रीटमेन्ट न करता थेट चेम्बर मध्ये सोडण्याचे काम करतात त्यांना मात्र आता अश्या प्रकारचे काम करू शकणार नाही व प्रदुषण ही याने कमी होईल.
Comments
Post a Comment