पैसे डब्बल करणारे पोलिसाच्या ताब्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांची उत्तम कामगिरी

 पैसे डब्बल करणारे पोलिसाच्या ताब्यात, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांची उत्तम कामगिरी


क्राइम अलर्ट : स्वप्निल पिंपळे 

बोईसर : आजकाल काम न करता झटपट पैसा कमवण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या शक्कल लढवत सामान्य जनतेला गंडा लावण्याचा प्रकार सुरू आहे. 


यमध्ये काही ऑनलाइन तर काही लोक मोठ्या मोठ्या बाता करुन लोकांची फसवणुक करण्यात यशस्वी होतात.


 असाच प्रकार बोईसर येथे घड़ला आहे. हेरा फेरी सिनेमा सारखाच काही दिवसात पैसे डब्बल करुन देतो सांगून बरेच लोकांची फसवणुक करण्याऱ्या तीन आरोपींना तारापूर पोलिसानी ताब्यात घेतले आहे.यात 1)रोशन रमेश सिंग वय. 30 2)संतोष मस्तराम उपाध्याय वय.31 3)मनबोध मेवालाल मौर्य वय.31 हे तिघेही उत्तर प्रदेश येथील असून कामासाठी मुंबई ला अलग अलग जागी राहतात. यात रोशन सिंग हा कुरगांव येथील SRA वृदावन सिटी या इमारतीत ठेकेदाराकडे प्लंबर काम करत असून पैसे डब्बल करुन लोकांना फसवण्यात माहिर होता. या तिघांनी बरेच लोकांना सात दिवसात पैसे डब्बल करुन देतो सांगून लाखो रुपयाचा चुना लावण्याची बोलल जात आहे.



 तारापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांना माहिती मिळताच आपल्या टीम सोबत पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या तिन्ही आरोपीन्हा नागझरी येथे अटक करुन कलम 420,34 लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी