लाच प्रकरणी दोन अधिकाऱ्याना अटक
लाच प्रकरणी दोन अधिकाऱ्याना अटक
भिवंडी: भिवंडी येथील सुपेगाव येथील ग्रामसेवक जयेश विनायक थोरात व सुदेश विष्णु भास्कर यांना लाचेची मांगणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
यातील जयेश थोरात हा ग्रामपंचायत सुपेगांव मध्ये ग्रामसेवक असून सुदेश भास्कर हा पंचायत समिति मध्ये शाखा अभियंता पाणी पुरवठा विभाग मध्ये कार्यरत होते. यात तक्रारदार यांच्या पुतणी कड़े ग्रामपंचायत सुपेगाव या कार्यालयाचे डागडुजी कामाचे काम मिळाले होते. सदरचे काम जानेवारी 2022 मध्ये पूर्ण झाले होते. सदर कामाचे बिल तक्रारदार यांची पुतणी हिच्या बँक खात्यामध्ये प्राप्त झाले होते. यात बिल मंजूर प्रकरणी थोरात व भास्कर यांनी तक्रारदार यांच्या पुतणी कड़े 25,000 रुपयाची लाचेची मांगणी करुन तड़जोड़ी अंती जयेश थोरात यांनी लाचेची रक्कम 20,000 रूपये स्वीकारल्याने त्यांना 23/06/2022 रोजी भिंवडी येथे रंगेहाथ पकड़ण्यात आले.
Comments
Post a Comment