दारू पिण्याच्या कारण्याच्या वादातुन पांच मित्रांनी एका मित्राला मारले ठार
दारू पिण्याच्या कारण्याच्या वादातुन पांच मित्रांनी एका मित्राला मारले ठार
पास्थळ मध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या खुनाचे आरोपी अखेर पोलिसाच्या ताब्यात
क्राइम अलर्ट :
बोईसर :तारापुर बोईसर रोड येथील इद्रप्रस्त प्रेट्रोल पंपाच्या मागील बाजूस आत्मशक्तिनगर बाजुकडे रोडवर दि.17 जून 2022 रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता.त्यावेळी घटनास्थळी सहा. पोलिस अधीक्षक नित्यानंद झा. व सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांनी पाहणी केली असता सदर इसमाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगड़ाने ठेचून मारल्याचे आढ़ळून आले.
सदर तपासामध्ये त्या मृतदेहाजवळ कोणतेही पुरावे दिसून आले नसता पोलीसानी तपास सुरु ठेऊन अखेर सी. सी. टी. वी फुटेज द्वारे गुन्हे गाराना पकड़ण्यात आले आहे. या मध्ये मृताचे नाव पवन पोपट मुळीक (वय 29) असून तो पांचमार्ग नविन चिंचवाड़ी येथे राहत होता. हा खून त्याच्या पांच मित्राने ज्याचे नाव सुशील गबरियल ऐक्का (21), फिरू मंगल किरकिटा (27), मिलेयो इथेट डुमडम (31), प्रफुल्ल गबरियल ऐक्का (26) व ग्रेम सोरेग हा फरार आरोपी अश्या पांच मित्रान मिळून दारू पिण्याच्या कारणाच्या वादावरून पवन मुळीक याला ठार मारल्याचे पोलीसानी सांगितले.सदर गुन्हेगाराना 22 जून 2022 रोजी अटक करून 28जून 2022 पर्यत पोलिस कोठड़ी मंजूर केली आहे.
सदर गुन्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत गायकवाड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, पो हवा/ रमेश हाडळ, प्रशांत तुरकर, रामचंद्र तांबडा, संदिप सुर्यवंशी, पो नाईक मनोज अंबीरे, पो अंमल राजेंद्र केदार तसेच बोईसर पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो उ निरिक्षक शरद सुरळकर, पो नाईक संदिप सोनावणे, दुषंत कांबळे, पो अंमल संतोष वाघचौरे यांनी तपास करून उपरोक्त खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा करत आहे
Comments
Post a Comment