बॅनर काळे करण्याऱ्या उद्धव ठाकरे समर्थकांना नरेश धोडीकडून लाल करण्याची धमकी
बॅनर काळे करण्याऱ्या उद्धव ठाकरे समर्थकांना नरेश धोडीकडून लाल करण्याची धमकी
बोईसर :राज्यात सध्या सर्वत्र शिवसैनिक व शिंदे समर्थकांत वाद उफाळून सर्वत्र तोड़फोड़ व शक्तिप्रदर्शन दिसून येत आहे
अशीच घटना काल बोईसर येथील ओस्तवाल परिसरात शिंदे समर्थक नरेश प्रकाश धोड़ी यांनी लावलेल्या बॅनरवर शिवसैनिकांनी काळे फासून आपला निषेध व्यक्त केला होता.
त्यानंतर पोलिस बंदोबस्तात तात्काळ बॅनर काढण्यात आले होते.
मात्र नरेश धोड़ी यांनी शिवसैनिक कार्यकत्याला फ़ोन करून सांगितले की पोलिस बंदोबस्तात बॅनर काढण्याची गरज का मला सांगितल असत तर मी आलो असतो पोलिस बंदोबस्त होता म्हणून नाही आलो नाही तर मी तेथे यायला तैयार च होतो तुम्ही बॅनर काळे केले मी भाई पटेल यांना लाल केल असत अस सांगत जर जमलस तर सर्वाना बोलवुन संध्याकाळ चा परत कार्यक्रम पोलिसांना न बोलवता ठेवायला सांग आणि हे मी जे बोलतो ते रिकॉर्ड करुन सर्वांना पर्यंत पोहचव.
मात्र या मुळे बोईसर मध्ये ही एकनाथ शिंदे समर्थक व शिवसैनिकांत मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment