औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारीकरणात होतेय वृक्षांची खुलेआम कत्तल
औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारीकरणात होतेय वृक्षांची खुलेआम कत्तल
क्राइम अलर्ट :स्वप्निल पिपळे
औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण होत असताना राखीव भूखंडावरील वृक्षांची खुलेआम कत्तल होत आहे परंतु औद्योगिक क्षेत्रांचे विस्तार होणे आवश्यक असून बरेच कारखाने बंद स्वरूपात असून बऱ्याच कारखान्यात विविध प्रकारचे ट्रेडिंग उद्योग केले जाते आहे.
कारखाना मालकांवर कुठलाही दबाव नसल्यामुळे बेलगाम वृक्षांची खुलेआम कत्तल कारखाना मालकाकडून होत आहे. अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, तसेच औद्योगिक महामंडळाला कडून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते परंतु कारखाना मालक आपल्या फायद्यासाठी हेच वृक्ष सरेआम कत्तल करून मोकळ्या जागेवर जमा करून जाळण्यासाठी वापर करतात.
परिणामी आज प्रदुषणात भयंकर वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे आवश्यक असून औद्योगिक महामंडळाकडून तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एखादा तरी भूखंड राखीव ठेवणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment