बोईसर मध्ये प्लास्टिक व थर्माकोल ची जनजागृति मोहिम

 बोईसर मध्ये प्लास्टिक व थर्माकोल ची जनजागृति मोहिम 

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडल, तारापुर द्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.



पालघर : पर्यावरण वाचवणे ही आज काळाची गरज झाली आहे. वाढते प्रदुषणामुळे आज जगणे मुश्किल झाले आहे. ज्या प्रमाणे लोकसंख्या वाढत चालली आहे आणि  इमारती साठी झाडे तोडली जात आहे.यामुळेच पर्यावरणच संतुलन बिघडत चालले आहे. या मुळे जास्तीत जास्त झाडे लावुन पर्यावरण वाचवणे गरजेच आहे.

 आज 05 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडल, तारापुर तर्फे एकल वापर (सिंगल



 युज )प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत काय वापर करू नये यामध्ये केद्रीय पर्यावरण, वने व हवामान बद्दल मत्रालयाने ऑगस्ट 2021मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021नुसार एकल वापर प्लास्टिक वस्तु प्रतिबंधित आहेत व याचबरोबर महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोलअधिसूचना 2018 अंतर्गत प्रतिबंधित आहेत या बद्दल बोईसर परिसरात माहिती देण्यात आली यावेळी 

उप-प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, क्षेत्र अधिकारी तानाजी पाटील, पवार, स्वप्निल लिंगड़े, सोरगे, शिंगारे, केतन पाटील, व सर्व स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका