बोईसर पोलिसांची आणखी एक उत्तम कामगिरी
बोईसर पोलिसांची आणखी एक उत्तम कामगिरी
कुंभवली गावातून लाखोंची चोरी करणारे गजाआड
बोईसर : बोईसर - तारापूर हे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे येथे परराज्यातून रोजगारासाठी लाखो लोग इथे येऊन राहत असल्याने बोईसर मधे गुन्हेगारी जरी वाढली असली तरी स्थानिक पोलिस गुन्हेगाराना पकड़ण्यात ही तेवढेच माहिर आहेत . त्यामुळे पोलिस गुन्हेगाराना दुसऱ्या राज्यातून पकडून आणत आहेत.
असेच गुन्हेगार आज बोईसर शहरातील कुंभवली गावातील गजानन नगर येथुन चोरी करण्याऱ्या आकाश कुमार पांडे व साहिल महेंद्र भारती असे दोन चोराना पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दयानंद पाटील आणि नयन डोंगरकर यांनी सराईत चोराना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार हे चोर उत्तर प्रदेश चे राहणारे असून हे चोर एवढे शातिर होते की चोरी करून वाराणसीला विमानने पळून जायचे व परत काही दिवसानी चोरी करायला वाराणसी तुन मुंबई ला परत यायचे अश्या या दोन्ही चोरानी बोईसर परिसरात लाखो रूपयाची चोरी करुन मुंबई ते वाराणसी असा नेहमीच प्रवास करत असत.या दोन्ही चोराना बोईसर पोलिस ठाण्यात 8 ते 10 केसेस आहेत. सदर माहिती मिळताच पोलिसांनी ताब्यात घेऊन कलम 380,457,511,34 लावून त्यांना अटक करण्यात आली आहे.त्याच्या दोन साथी दार अजूनही फरार आहेत त्यामुळे यांच्या शोध पोलिस घेत आहेत.
Comments
Post a Comment