बोईसर शहरात अतिक्रमण ठरतेय नागरिकाची डोकेदुखी:
बोईसर शहरात अतिक्रमण ठरतेय नागरिकाची डोकेदुखी:
नैसर्गीक नाल्यावर बनतील बंगले, दुकाने व ईमारती
पालघर: बोईसर शहर हे औद्योगिक क्षेत्रामुळे भरपूर विकसित झाले आहे.यात वाढत्या लोकसंख्या मुळे येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे ही केलेले दिसून येत आहे.
यामध्ये बोईसर व सरावली ग्राम पंचायती हद्दित बिल्डरानी आता सरकारी जागेवर ही अतिक्रमण करुन हॉटेल व इमारती बांधल्याचे दिसून येते.
अशीच एक घटना सरावली ग्रामपंचायत मधील मौजे सरकारी स. न.121 जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे हे तेथील नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीत नवापुर नाका ते अमेया पार्क या मुख्य रस्त्यावरील संजय नगर या विभागातील नाला हा बोईसर ओस्तवाल पासून सुरु झालेला नैसर्गीक नाला हा संजय नगर पुला खालून यशवंत सृष्टि येथे बाहेर पडतो. एकेकाळी भलामोठा नाला आज बेकायदेशीर बांधकामामुळे छोटा झाला आहे. यामुळे त्याचा थेट परिणाम तेथे राहण्याऱ्या रहिवाश्याना पावसाळ्यात गटारीचे पाणी अमेया पार्क येथील रहिवाश्याच्या घरात घुसून त्यांना अनेक समस्याना तोड़ द्यावे लागत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार या परिसरातील नागरिकानि वारंवार तक्रार व निवेदन देऊन ही कोणतीही कारवाई होत नसल्याने अतिक्रमण वाढत चाललेल आहे. व असच सुरु राहिल तर नैसगिक नाला नाहीसा होऊन लवकरच त्यावर ही ईमारत, दुकाने, व बंगले उभी करतील यावर काही शंका नाही त्यामुळे प्रशासनाला या कड़े लक्ष घालून त्या रहिवाश्याचे प्रश्न सोड़वुन सरकारी जमीन ताब्यात घेणे गरजेच आहे.
Comments
Post a Comment